ETV Bharat / city

Anand Dighe : किती आहे आनंद दिघेंची संपत्ती? जाणून तुम्हालाही बसेल धक्का - आनंद दिघे यांचे आश्रम

दसरा मेळाव्याच्या ( Dussehra Melawa ) दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना एक धक्कादायक खुलासा केला होता. हा खुलासा होता धर्मवीर आनंद दिघे ( Dharmaveer Anand Dighe ) यांच्या मालमत्तेबाबत होता.

Anand Dighe
आनंद दिघे कार्यकर्तयासोबत
author img

By

Published : Oct 15, 2022, 9:35 PM IST

Updated : Oct 15, 2022, 10:43 PM IST

ठाणे : दसरा मेळाव्याच्या ( Dussehra Melawa ) दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना एक धक्कादायक खुलासा केला होता. हा खुलासा होता धर्मवीर आनंद दिघे ( Dharmaveer Anand Dighe ) यांच्या मालमत्तेबाबत होता. सर्वसामान्य घरातला एक कार्यकर्ता ज्याने आपल्या कामाने स्वतःची ओळख निर्माण केली काम करताना लाखो लोकांची संबंध निर्माण झाले आणि एक नेता तयार झाला अशा प्रकारची ओळख असलेल्या आनंद दिघे यांची मालमत्ता किती ( How much property of Anand Dighe? ) होती, हा एक दसरा मेळाव्यानंतर चर्चेचा विषय होता. प्रत्यक्षात त्यांची मालमत्ता किती होती याचा आढावा घेतला असता त्यांनी वडिलोपार्जित घरा व्यतिरिक्त त्यांची मालमत्ता काहीच नसल्याचे समोर आले आहे.

किती आहे आनंद दिघेंची संपत्ती

आनंद दिघे यांची मालमत्ता किती? दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे यांच्या मालमत्तेविषयी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी चौकशी केल्याची सांगितले आणि मग लोकांच्या मनामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांची मालमत्ता किती होती हा प्रश्न उभा राहिला. या प्रश्नाचे उत्तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका त्यांच्या मित्राने दिले आहे. हे उत्तर ऐकून तुम्ही थक्क व्हाल कारण खिशात एकही रुपया नसलेला हा माणूस महाराष्ट्रामध्ये एवढा मोठ वलय कसा निर्माण करू शकला तर त्याचे उत्तर हे त्यांनी कमावलेली मालमत्ता नसून त्यांनी कमावलेले लोक कार्यकर्ते आणि संबंध हे होते. वडिलोपार्जित घर हे देखील बहिणीच्या ताब्यात आहे. त्यांचे कार्यालय असलेला आनंदाश्रम आजही कार्यकर्त्यांच्या ताब्यात आहे. त्यांच्याकडे असलेल्या सोनं नाणं हे देखील आजही आनंद मठामध्ये पाहायला मिळते. त्यांची असलेली वाहन ही लोकांनी दिलेल्या मदतीतून निर्माण झाली होती.

Anand Dighe
आनंद दिघे कार्यकर्तयासोबत
Anand Dighe
आनंद दिघे यांच्या अटकेचा फोटो

लोकांनी घडवलेला नेता - अगदी युवक अवस्थेपासून नागरिकांच्या मदतीसाठी धावणारा एक युवक सर्वसामान्य घरातून शिवसेनेच्या नेत्या पदापर्यंत पोहोचला ज्याला बाळासाहेब यांनी पहिली गाडी दिली आणि ती जुनी झाल्याने भारतीय कामगार सेनेने दुसरी गाडी दिली. असे ते आनंद दिघे आजही महाराष्ट्रामध्ये लोकांच्या आठवणीत आहेत.

Anand Dighe
आनंद दिघे यांच्या अटकेचा फोटो
Addressing Anand Dighe
आनंद दिघे संबोधित करताना

लोकांनीच केला खर्च - धर्मवीर आनंद दिघे यांना जिल्हाभर महाराष्ट्रभर फिरत असताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन अनेक मित्रांनी मनमोकळेपणाने त्यांना मदत केली. या मदतीमुळेच ते महाराष्ट्रभर फिरू शकले फिरत असताना लोकांच्या अडचणी सोडवणे हे एकमेव ध्येय त्यांच्या मनामध्ये होतं. म्हणूनच अगदी वकिलापासून डॉक्टर पर्यंत, बिल्डरांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच लोक आनंद दिघे यांच्या मित्रांच्या यादीमध्ये होते.

Anand Dighe wealth
आनंद दिघे

बाळासाहेबांनी दिली होती पहिली गाडी - आनंद दिघे यांची आर्थिक परिस्थिती, त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी आनंद दिघे यांना पहिली गाडी भेट स्वरूपात दिली. जी गाडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून आनंद दिघे यांच्या सुरुवातीच्या काळात मदतीची ठरली. कालांतराने ही गाडी देखील खूप वर्ष वापरल्याने नादुरुस्त झाल्यावर भारतीय कामगार सेनेने दुसरी गाडी दिली. जी गाडी होती आरमाडा याच आरमाडांमध्ये अपघात होऊन कालांतराने त्यांचा मृत्यू झाला.

खिशात पैसे नसतानाही लोकांच्या अडचणी सोडवल्या - अनेक पोलीस केसेस अंगावर असताना न्यायालयात जाण्या येण्यासाठी होणारा त्रास वकिलांची फीस इतर खर्च हे आनंद दिघे यांचे मित्र स्वतःहून करायचे मुंबईला न्यायालयात जात असताना ते ट्रेनने प्रवास करत असत. तेव्हा जेवताना बिल भरण्यासाठी त्यांच्यासोबत असलेले मित्र हे खर्च करत असल्याचे आज त्यांच्या एका जवळच्या मित्राने सांगितले.

या नेत्याची संपत्ती अमूल्य होती - आनंद दिघे यांनी कमावलेली संपत्ती काहीच नसली तरी त्यांनी कमावलेले मित्र गरिबांचे मिळालेले आशीर्वाद हे अमूल्य असल्याचे आनंद दिघे यांचे मित्र सुधीर कोकाटेंना सांगताना त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले.
(सुधीर कोकाटे आनंद दिघे यांचे मित्र)

Last Updated : Oct 15, 2022, 10:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.