ETV Bharat / city

आव्हाड इज ब‌ॅक! जितेंद्र आव्हाडांची कोरोनावर यशस्वी मात - जितेंद्र आव्हाड कोरोनावर मात

जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाल्याची सर्वप्रथम जेव्हा चर्चा झाली, तेव्हा त्यांनी ती फेटाळली होती. मात्र, काही आठवडयांपूर्वी आव्हाडांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : May 9, 2020, 8:35 PM IST

ठाणे - मुंब्रा-कळवाचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अखेर कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. काही दिवसांपूर्वीच आव्हाड यांना कोरोनाची लागण झाल्याने स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होत. अखेर कोविड-19 विरोधातील लढ्याला जितेंद्र आव्हाडांना यश आले आहे. उपचारानंतर आव्हाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे बोलले जात आहे. आव्हाडांचे निकटवर्तीय आणि कार्यकर्त्यांकडून मात्र या वृत्ताला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.

हेही वाचा... प्रकृती ठीक असल्याचे अमित शाहांनी केले स्पष्ट; 'हितचिंतकां'साठी दिला खास संदेश..

जितेंद्र आव्हाडांची कोरोनावर मात...

राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे अखंडपणे मतदारसंघातील गरजू आणि गोरगरिबांना अन्न वाटप करत होते. त्याच दरम्यान मंत्री जितेंद्र आव्हाडांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा सुरु झाली. सुरुवातीला आव्हाडांनी हे वृत्त आक्रमकपणे फेटाळून लावले. मात्र, काही आठवडयांपूर्वी त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आव्हाडांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.

आव्हाडांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे स्वतः आव्हाडांच्या तब्येतीवर देखरेख ठेवून होते. त्याबाबत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती देत होते. स्वतः ठाकरेंनी आव्हाड यांच्याशी फोनवरून संवाद साधत तब्येतीची विचारपूस केली होती. तसेच कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओकदेखील आव्हाडांच्या प्रकृतीचे अपडेट घेत होते. सर्वांनीच आव्हाड लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना फोन करून प्रकृतीची अत्यंत आस्थेने चौकशी केली. त्यावेळीही जितेंद्र आव्हाड यांनी एखाद्या विजयी योद्ध्या प्रमाणेच त्यांना उत्तर दिले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.