ठाणे - ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरात घरामध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने बुधवारी दुपारी छापेमारी करून पर्दाफाश केला. पोलिसांनी या कारवाईत दोन अभिनेत्री, दोन महिला एजंट आणि एक पुरुष दलाल अशा पाच जणांना अटक केली आहे. लॉकडाऊनमुळे चित्रीकरण बंद असल्याने आर्थिक चणचण दूर करण्यासाठी आणि आपल्या हायफाय गरजा भागविण्यासाठी सिरीयल आणि सिनेमामध्ये अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या कलाकारांना वेश्या व्यवसायाची नामुष्की पत्करावी लागल्याचे चित्र या घटनेने समोर आले आहे. दरम्यान, ठाणे शहरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या घरमालकीणीसह दोन एजंट यांना ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. यात सहभागी असणाऱ्या दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली असून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा ः- अनैतिक संबंधातून नवऱ्याचा किचनमध्येच पुरला मृतदेह, २८ वर्षीय तरुणीसह प्रियकराला अटक
ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने छापेमारी करून हे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. मुंबईतील एका मोठ्या सेक्स रॅकेट एजंटच्या संपर्कात या दोन्ही अभिनेत्री होत्या. याच एजंटच्या माध्यमातून या दोन्ही अभिनेत्री ठाण्यात वेश्याव्यवसाय करता आल्या होत्या. वेश्या व्यवसाय करता या दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घेत होत्या. दलालाच्या आणि ग्राहकाच्या माध्यमातून २ लाखाच्या मागणीवरून १ लाख ८० हजारात सौदा नक्की झाला. ग्राहकाच्या वेळेनुसार दोन्ही अभिनेत्री या ठाण्याच्या पाचपाखाडी नटराज सोसायटीतील प्लॅटमध्ये आल्या. याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोकणे यांनी सापळा रचून माहितीची खातरजमा करीत छापेमारी केली. घटनास्थळी एक महिला घरमालक, दोन अभिनेत्री, एक महिला एजंट आणि एक पुरुष दलाल अशा पाचजणांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास गुन्हे शाखा करीत आहे.
हेही वाचाः- नागीन फेम अभिनेता पर्ल पुरीला अटक, १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याबाबत कारवाई
सिरीयल कनेक्शन -
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या दोन्ही अभिनेत्रींनी तामिळ सिनेमात लीड रोल केला असून बॉलिवूडच्या काही सिनेमात साईड रोल आणि सिरीयलमध्ये मुख्य रोल केलेला आहे. सध्या कोरोनामुळे सर्वत्र लाॅकडाऊन असल्याने चित्रीकरण देखील बंद आहे. अशातच आपले महागडे चोचले पुरवण्यासाठी आणि आर्थिक चणचण दूर करण्यासाठी या अभिनेत्री वेश्या व्यवसायातून लाखो रुपये कमवून आपल्या गरजा पूर्ण करण्याकरता हे सगळे केले जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या अभिनेत्री यांच्या रॅकेट उध्वस्त करण्यात आले आहे. मात्र बऱ्याच अभिनेत्री या वेश्याव्यवसाय करीत असल्याची माहिती दोन्ही अभिनेत्री यांच्या चौकशीत समोर आले आहे. तर वेश्याव्यवसाय करून पैसे कामविणाऱ्या अनेक अभिनेत्री या मुंबई आणि ठाणे येथील एजंटच्या संपर्कात असल्याची माहितीही समोर येत आहे.
हेही वाचाः- बजाजनगरमध्ये भर वस्तीत आढळला अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह
हाय प्रोफाइल कस्टमर -
एक हाय प्रोफाईल त्याचपद्धतीने श्रीमंत व्यक्तींकडून या अभिनेत्रींची वेश्या व्यवसाय करता मागणी केली जाते. त्यामुळे ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट वन केलेल्या कारवाईची लिंक ही फक्त ठाणे मुंबई पुरतीच सीमित नसून इतर राज्यात देखील असल्याचे बोलले जात आहे त्यानुसार ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ त्या दृष्टीने तपास करत आहेत. पोलिसांनी दोन अभिनेत्री, दोन महिला एजंट आणि एका पुरुष एजंटचे मोबाईल जप्त केलेले आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये अनेक अभिनेत्री, मॉडेल, ब्युटीक्वीन यांचे फोटो सापडले आहेत. दरम्यान गुन्हे शाखा युनिट-१ चे पथक हे मोबाईलमध्ये आढळलेल्या सर्व अभिनेत्री आणि ब्युटीक्वीन यांची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.