ETV Bharat / city

बदलापुरात सबवेमध्ये साचलेल्या पाण्यात अडकली कार; अंबरनाथ, उल्हासनगरात जनजीवन विस्कळीत

author img

By

Published : Jun 9, 2021, 7:16 PM IST

हवामान विभागाने कोकणात ३ दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावत बदलापूर अंबरनाथ, उल्हासनगर शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढले आहे. आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे.

पाऊस अपडेट
पाऊस अपडेट

ठाणे - हवामान विभागाने कोकणात ३ दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावत बदलापूर अंबरनाथ, उल्हासनगर शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढले आहे. आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. तिन्ही शहरातील सखल भागात पाणी साचून जलमय झाले आहे. तर बदलापूर रेल्वे स्थानकानजीक असलेल्या बेलवली-कात्रप मार्गावरील सबवे पाणीखाल्या गेल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यातच एका कार चालकाने याच पाण्यातून वाट काढत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सबवेच्या मध्येच इंजिनमध्ये पाणी जाऊन कार बंद पडल्याने अडकून पडली.

बदलापुरात सबवेमध्ये साचलेल्या पाण्यात अडकली कार

मोठ्या नाल्यांना पूरसदृश परिस्थिती, सखल भाग जलमय

मुसळधार पावसामुळे उल्हासनगरमधील सर्वच मोठ्या नाल्यांना पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शहरातील सखल भाग जलमय होऊन नाल्याकाठी असलेल्या अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. तर अंबरनाथ शहरातही तीच परिस्थिती झाली असून नालेसफाईचा बोजवारा उडून अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले आहे.

क्रेनच्या मदतीने कार काढली बाहेर
बदलापूर रेल्वे स्थानकानजीक असलेल्या बेलवली येथील रेल्वे क्राॉसिंग म्हणजे बेलवली आणि कात्रपला जोडणारा सबवे या सबवेमध्ये पाणी साचल्याने इनोव्हा कार अडकली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन ही कार आता क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली. विशेष म्हणजे दरवर्षीच पावसाळ्यात या सबवेमध्ये पाणी साचण्याची घटना घडत असते. त्यातच हवामान खात्याने येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन सज्ज राहण्यास सांगितले होते. मात्र पाण्याचा निचरा करण्यासाठी कुठलीही यंत्रणा सज्ज नसल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा - Pune MIDC Fire : कंपनी मालक निकुंज शहाला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.