ठाणे : सनासुदी निमित्त रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना लक्ष करत सोनसाखळी चोरणाऱ्या ( Gold chain thieves ) दोघा चोरट्याना नागरिकांनी पकडून बेदम चोप ( Thieves were brutally beaten by citizens ) दिला. हा प्रकार ठाण्यातील परमार्थ निकेतन भागात रात्री घडला. सोनसाखळी चोरल्यावर महिलांनी आरडाओरड केली. त्यानंतर त्या भागात असलेल्या युवकांनी या चोरट्याना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याककडे एक सोनसाखळी, मंगळसूत्र मिळाले. स्थानिक युवकांनी पोलिसांना बोलावून दोन्ही आरोपीना नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान पोलीस घटना स्थळी पोहचेपर्यंत स्थानिकांनी या दोघा चोरांना बेदम मारहाण ( Thieves were brutally beaten ) केली. पोलिसांनी या चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन या चोरट्याची अधिक चौकशी पोलीस करत आहेत.
दुचाकींचा नंबर खोटा - ही चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी नागरिकांनी तपासली असता या दुचाकीचा नंबर देखील खोटा असल्याचे समोर आले आहे पोलीसांनी या बाबत गुन्हा दाखल केला असून या आरोपींची चौकशी सुरू केलेली आहे .
पकडल्यावर करत होते दिशाभूल - स्थानिक नागरिकानी दुचाकी थांबवून विचारपूस केल्यावर आम्ही ठाण्यात राहात असल्याची माहिती दोन्ही चोरांनी दिली मग त्यांना नागरिकांनी मारहाण केल्यावर त्यांनी आपली खरीं माहिती दिली या दोघांमधील एक चोरटा दोन महिन्यापूर्वीच चोरीच्या प्रकरणात जामिनावर सुटला असल्याने समोर आल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले आहे.