ठाणे ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यातील Kalva Police Station हद्दीत एका तरुणाने प्रेयसीसाठी घेतलेल्या कर्जाच्या नैराश्यातून आत्महत्या Suicide due to debt for girlfriend केल्याची घटना घडली आहे. या प्रियकराने आपल्या आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. त्यात त्याने आपल्या प्रेयसीचे नाव नमूद केले आहे. या चिट्ठीत आपण प्रेयसीमुळे कर्जबाजारी झालो Suicide of debt ridden lover असून पैश्याची मागणी केल्यानंतर प्रेयसीकडून वारंवार पोलिसांची धमकी Girlfriend threat दिली जात होती. याच नैराश्यातून या तरुणाने आत्महत्या करत असल्याचे चिट्ठीत नमूद केले आहे. या प्रकरणी प्रियकराच्या आईच्या फिर्यादीवरून आणि मिळालेल्या चिठ्ठीच्या सहाय्याने कळवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. Boyfriend suicide in Thane
कर्जाचे हप्ते भरण्यास प्रेयसीचा नकार ठाण्यातील रमाबाई आंबेडकर सोसायटी, कळवा येथे राहणारा २६ वर्षीय तरुण विक्रम मोरे या तरुणाचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबध होते. विक्रमने प्रेयसीच्या मागणीवरून एका खाजगी फायनान्स कंपनीतून अंदाजे ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र काही महिने कर्जफेड न केल्यामुळे फायनान्स कंपनीने कर्जफेडीचा तगदा लावला होता. ही बाब विक्रमने आपल्या प्रेयसीच्या लक्षात आणून देत घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यास सांगितले. मात्र प्रेयसीने याप्रकरणी टाळाटाळ केली आणि उलट विक्रमलाच शिवीगाळ करून पोलिसात तक्रार देण्याची धमकी देऊ लागली. प्रेयसीसाठी घेतलेल्या पैश्यामुळे कर्जबाजारी झालेल्या विक्रमला काही सुचत नव्हते आणि फायनान्स कंपनीकडून कर्जफेडीसाठी वारंवार लावण्यात आलेला तगाद्यापायी विक्रमने आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. आपल्यावरील दबाव आणि नैराश्यातून तरुणाने आपल्या राहत्या घरी किचनमधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विक्रम मोरे हा २६ वर्षीय तरुण एका खाजगी कंपनीत कामाला होता. विक्रम हा आपली आई, वडील आणि बहिणीसोबत या सोसायटीमध्ये राहत होता. त्याची आई नर्सचे आणि वडील हाउसकीपिंगचे काम करतात.
घरातून सगळे गेल्यावर केली आत्महत्या सकाळी सगळे कामावर गेल्यावर विक्रमने एक चिठ्ठी लिहिली आणि गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या चिठ्ठीत प्रेयसीचे नाव खोटारडी नावाने नमूद केले आहे. या चिठ्ठीच्या आधारे विक्रांत यांच्या कुटुंबीयांनी प्रेयसीच्या विरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रेयसीने विक्रमला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असून विक्रमला आणि कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
प्रेयसीला कळवा पोलिसांकडून अटक या प्रकरणात मिळालेली चिठ्ठी आणि विक्रांतच्या कुटुंबियांच्या फिर्यादीवरून ठाण्यातील कळवा पोलिसांनी तक्रार नोंद केली आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी प्रेयसीच्या विरोधात ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु करुन संबंधित तरुणीला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. तर या प्रकरणी निष्पक्ष तपास करून योग्य तो न्याय मिळवून देणार असल्याचे कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी सांगितले. मात्र या प्रकरणी कॅमेरावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.