ठाणे - भारताच्या सर्व भागात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जात आहे. शुक्रवारी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन मोठ्या भक्ती भावात करण्यात आले. त्यातच भिवंडी महापालिकेअंतर्गत 10 गणेश घाट येतात. गणेश विसर्जन घाटांवर कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून न दिल्याने जीवन रक्षकांसह सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ नाराज असल्याचे दिसून आले आहे .
दीड दिवसांचे गणपती विसर्जन; जीवनरक्षकांची सुरक्षा वाऱ्यावर
दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जन वेळी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकारी गेल्या 10 वर्षांपासून जीवन रक्षकांच्या रक्षणासाठी लाईव्ह जॅकेट तसेच त्याचं विमा योजना काढण्याची मागणी करत आहेत. परंतु पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. जर या जीवन रक्षकांना काही झाल्यास त्याची जवाबदारी कोण घेणार अशा सवाल महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
जीवनरक्षकांची सुरक्षा वाऱ्यावर,