ETV Bharat / city

Gangster Suresh Pujari : कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये अटक; सूत्रांची माहिती - गँगस्टर सुरेश पुजारी लेटेस्ट न्यूज

व्यावसायिकांसह राजकारणी व लोकप्रतिनिधींना खंडणीसाठी धमकी देणाऱ्या कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

gangster Suresh Pujari
गँगस्टर सुरेश पुजारीSuresh Pujari
author img

By

Published : Oct 19, 2021, 7:10 PM IST

ठाणे - ठाणे जिल्ह्यातील बहुतांश व्यावसायिकांसह राजकारणी व लोकप्रतिनिधींना खंडणीसाठी धमकी देणाऱ्या कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता त्याला भारताच्या ताब्यात देणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

केबल व्यावसायिकाच्या हत्येनंतर अधिकच दरारा -

सुरेश पुजारी यापूर्वी डॉन रवी पुजारीसोबत काम करत होता. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्याने रवी पुजारीपासून वेगळे होऊन स्वतःची टोळी तयार केली होती. तो नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे, कल्याण, उल्हासनगर येथील डान्स बार व हॉटेल मालकांना मोबाईलवर धमकी देऊन आपल्या हस्तकामार्फत खंडणी गोळा करत होता. विशेष म्हणजे ठाणे शहराव्यतिरिक्त, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, कल्याण आणि उल्हासनगरसह नवी मुंबईच्या विविध भागात रवी पुजारी आणि सुरेश पुजारी यांच्याकडून पुनर्प्राप्तीसाठी अनेकांना धमकी देण्यात आली होती. सुरेश पुजारीने उल्हासनगर केबल व्यावसायिक सच्चानंद करीरा यांची हत्या केल्यानंतर उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांनाही फोनवर धमकी दिली होती.

जितेंद्र आव्हाडसह भाजप आमदारालाही धमकी -

गँगस्टर सुरेश पुजारी हा विदेशात बसून ठाणे जिल्ह्यातील व्यापारी, बांधकाम व्यावसायीकांना धमकावून खंडणी वसूल करत होता. यापूर्वी अशीच धमकी त्याने युतीच्या काळात आमदार तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिली होती. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्याबाबत कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याला आपण जबाबदार असल्याचे म्हटले होते. तर दोन वर्षांपूर्वीच कल्याण पश्चिमेकडील गांधारी माधव संकल्पच्या मागील बाजूस असलेल्या काशीष पार्कमध्ये राहणारे भास्कर शेट्टी या कँटीन व्यावसायिकाला गँगस्टर पुजारीने धमकावले होते. शेट्टी यांना फोन करणाऱ्याने आपण सुरेश पुजारी बोलत असल्याची ओळख दिली. बऱ्या बोलाने 25 पेट्या टाक, नाहीतर ढगात पाठवीन अशी जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली. या प्रकारामुळे शेट्टी यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ कल्याणचे आमदार गायकवाड यांनाही त्याने अशाच पद्धतीने धमकावल्याने राजकीय, तसेच केबल व्यावसायिक मंडळींचे धाबे दणाणले होते. त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे समर्थक आमदार गायकवाड यांना दिलेल्या धमकीची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली होती.

कोण आहे हा गँगस्टर?

सुरेश पुजारी हा यापूर्वी उल्हासनगर येथील विश्वास ढाब्यावर नोकरी करत होता. त्यानंतर तो घाटकोपर येथील असल्फा व्हिलेज येथे राहात होता. तेथूनच त्याने गुन्हेगारी सुरू केली होती. उल्हासनगर येथील सच्छिदानंद केबल व्यवसायिकावर त्याच्या शूटरने गोळ्या झाडल्याची घटना सीसीटीव्ही कैद झाली होती. उल्हासनगरचे बांधकाम व्यवसायिक सुमित चक्रवर्ती यांना देखील सुरेश पुजारीने धमकीचा फोन केला होता. त्यावेळी सुमित चक्रवर्ती यांच्या मुलाने फोन उचलत सुरेश पुजारीला सुनावले होते. हिम्मत असेल तर समोर येऊन बोल, असे याच गँगस्टर पुजारीला खुले आव्हान दिले होते. असाच प्रकार तत्कालीन राष्ट्रवादीचे नगरसेवक व आता टीम ओमी कलानीमध्ये असलेल्या नगरसेवकाच्या बाबतीत घडला होता. या नगरसेवकाने सुरेश पुजारी यास सुनावले होते की "तु मला ओळखत नसशील पण मी तुला ओळखतो' तू उल्हासनगर येथील मंदाताईच्या ढाब्यावर कामाला होतास" असे सांगत सुरेश पुजारीची इज्जत काढली होती.

हेही वाचा - केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा रोखण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची रणनिती, पवार-ठाकरे बैठकीत खलबते..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.