ठाणे हिंदू मुस्लिम बांधव गुण्यागोवींदाने सामाजिक सलोखा राखत Ganeshotsav who maintains social harmony, गेली १७ वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा Ganeshotsav 2022 करत आले. कोरोनानंतर निर्बंधमुक्त सण साजरे केले जात असले तरी, गगनाला भिडलेल्या महागाईमुळे वर्गणीदारांनी यंदा हात आखडता घेतला आहे. यामुळे सामाजिक सलोखा राखणारा गणेश उत्सव, महागाईमुळे आर्थिक विवंचनेत सापडल्याने, जोपर्यत महागाई आटोक्यात येत नाही. तोपर्यत मंडळाने गणेशोत्सव साजरा केला जाणार नसल्याचा Hindu Muslim brothers breaks due to inflation निर्णय घेतला.
सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार भिवंडी तालुक्यातील कोनगावात, ड्रीम कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना २००३ साली विकासक ईशाद खान यांनी करून गणेश उत्सव साजरा केला. त्यानंतर गेल्या १७ वर्षापासून येथिल सर्वधर्मीय रहिवाशी, दरवर्षी उत्सव साजरा करत आले. या मंडळात अनेक वर्षापासून हिंदू मुस्लिम एकत्र येत, सामाजिक सलोखा राखत उत्सव साजरा करत आहे. ठाणे पोलीस आयुक्त कार्यलयाकडून चार वर्षांपूर्वी, भिवंडीतील स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्य गृहात सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते देऊन मंडळातील कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
वाढत्या महागाईचा फटका यंदाच्या वर्षी परिसरातील उद्योजक, दुकानदार आणि नागरिकांना मंडळाला वर्गणी देणे कठीण जात आहे. कोरोनामुळे ओढवलेल्या आर्थिक समस्येमुळे देणगीदारांनी देखील हात आखडता घेतला आहे. उत्सवासाठी निधीची उणीव भासत असून, गणेशोत्सव मंडळातील शिलकीतील निधी सलग मागील दोन वर्षे कोविड आणि परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला होता. तर गेली दोन वर्षी कोरोनामुळे आर्थिक गणित विस्कटल्याने देणगी आणि वर्गण्यांवर परिणाम झाला. शिवाय वाढत्या महागाईचा फटका मंडळाला बसल्याने उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याच मंडळाचे कार्याध्यक्ष अहमद पटेल यांनी सांगितले.