ठाणे : कल्याण पश्चिम भागातील रामबाग परिसरातील विजय तरुण मंडळाने Vijay Tarun Mandal in Kalyan यंदाच्या गणेशोत्सवात शिवसेनेत दोन गट पडून जो सत्ता संघर्ष निर्माण झाला. त्या बंडखोरीवरील चलचित्र Shiv Sena rebellion movie scene in Kalyan देखावा तयार केला होता. या देखाव्याला पोलिसांनी आक्षेप घेत या देखाव्यावर कारवाई Police action on scene करत देखाव्याची सामुग्री जप्त केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांचा देखाव्यावर आक्षेप - कल्याण पश्चिम भागातील रामबाग परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण डोंबिवली महानगर प्रमुख विजय साळवी राहतात. ते विजय तरुण मंडळाचे विश्वस्त आहे. विशेष म्हणजे मंडळाच्या वतीने दरवर्षीच वर्षातील एखाद्या महत्वाच्या घडामोडीवर देखावा गणपती समोर साकारला जातो. त्यातच यंदाच्या वर्षात सत्ता संघर्ष होऊन शिवसेनेत उभी फूट पडल्याने यावर देखावा साकारण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या देखाव्यावर आक्षेप घेऊन आज पहाटेच्या सुमारास देखावा जप्त करून पोलीस ठाण्यात नेला.
हेही वाचा - Ganesh Chaturthi 2022: प्रतिष्ठेसोबतच वादाची परंपरा कायम, लालबागच्या राजाला पहिल्या दिवशी राडा
पोलिसांची पहाटेच्या सुमारास कारवाई - दरम्यान मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी पोलिसांच्या कारवाईवर बोलताना सांगितले कि, देखाव्यात काहीच आक्षेपार्ह नव्हत ,तरीही पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास कारवाई केली. ही हिटलरशही असून आम्ही या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार असून या कारवाईचा निषेध म्हणून आम्ही यंदा गणेश मूर्तीची स्थापना करणार नसल्याचे मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी सांगितले. मात्र या घटनेनंतर कल्याणातील शिवसेना गटात मोठी खळबळ उडाली आहे.