ETV Bharat / city

Moon Land Cheating : चंद्रावर जमीन घेणाऱ्या विकासकासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

तक्रारदार परमानंद माखिजा ( Complainant Parmanand Makhija ) यांची मालकीची ७७० चौ. फुटाची जमीन उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर ४ मधील ओटी सेक्शन परिसरात आहे. याच जमिनीची १५ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२२ दरम्यान भरत रोहरा ( Bharat Rohra ) , अजीज शेख ( Aziz Shaikh ) व राम वाधवा ( Ram Wadhwa ) यांनी आपसात संगनमत करून या जमिनीचे बनावट कागदपत्र तयार केली.

विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन
विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन
author img

By

Published : Apr 23, 2022, 8:04 PM IST

ठाणे - चंद्रावर जमीन घेणाऱ्या उल्हासनगरमधील एका बांधकाम व्यवसायिकासह तिघांनी उल्हासनगर मधील ७७० चौ. फुटाच्या जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून परस्पर विक्री केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ( vitthalwadi police ulhasnagar ) ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. भरत रोहरा, अजीज शेख व राम वाधवा असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहे.

तक्रारदार परमानंद माखिजा ( Complainant Parmanand Makhija ) यांची मालकीची ७७० चौ. फुटाची जमीन उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर ४ मधील ओटी सेक्शन परिसरात आहे. याच जमिनीची १५ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२२ दरम्यान भरत रोहरा ( Bharat Rohra ) , अजीज शेख ( Aziz Shaikh ) व राम वाधवा ( Ram Wadhwa ) यांनी आपसात संगनमत करून या जमिनीचे बनावट कागदपत्र तयार केली. त्यानंतर ही जमीन परस्पर राजेश तलरेजा यांना विक्री केली. विशेष म्हणजे विक्रीचा व्यवहार करताना २०१९ साली ५० हजार रुपयांचे टोकण घेऊन फसवणूक केल्याचे जमिनीचे मालक परमानंद माखिजा यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

राजकीय हेतूने गुन्हा दाखल - विशेष म्हणजे गुन्हा दाखल होण्यापूर्वी बांधकाम व्यावसायिक राम वाधवा यांनी २०२० साली चंद्रावर जमीन घेण्यासाठी जयपूरच्या एका कंपनीशी संपर्क केला होता. त्यानंतर राम वाधवा यांनी एक महिनाभर आधी कागदोपत्रांची पूर्तता केल्यावर त्यांच्या हाती चंद्रावर जमीन खरेदीची पावती मिळाली होती. चंद्रावरील जमीन ४३ हजार ५०० स्केअर फिट अर्थात एक एकर आहे. तसेच जंगलात, समुद्रात, अवकाशात रीचेबल असलेल्या सॅटेलाईट फोनदेखील त्यांनी त्यावेळी बीएसएनएल कडून घेतला होता. एकंदरीत एवढे सगळे असताना केवळ ७७० चौ. फुटाच्या जमिनीच्या फसवणूक प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. या बाबत बांधकाम विकासक राम वाधवा यांच्याशी संपर्क साधला असता हा गुन्हा राजकीय हेतूने आपल्यावर दाखल केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा-Lemon Theft Video : चोराने 50 किलो लिंबू भाजी मंडईमधून पळविले, पोलिसांत गुन्हा दाखल

हेही वाचा-Amit Shah on common civil code : देशभरात समान नागरी कायदा लागू होणार - अमित शाह यांची घोषणा
हेही वाचा-VIP security cuts in Punjab : पंजाबमधील व्हीआयपी लोकांच्या सुरक्षेत कपात, विरोधकांकडून टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.