ठाणे - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या विरोधात समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला ( Ketaki Chitale ) ठाणे गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर तिला ठाणे न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुणवण्यात आली. त्यानंतर गोरेगाव पोलिसांनी केतकीचा ताबा घेतला. दुसरीकडे गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथून आणलेला निखिल भामरे ( Nikhil Bhamre ) याला गुरुवारी (दि. 19 मे) न्यायालयात नेले असता त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
-
काय पातळी वर हे सगळे होते आहे ... ह्या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा @MumbaiPolice @CPMumbaiPolice @DGPMaharashtra @PuneCityPolice @ThaneCityPolice pic.twitter.com/WY5TSaKURZ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">काय पातळी वर हे सगळे होते आहे ... ह्या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा @MumbaiPolice @CPMumbaiPolice @DGPMaharashtra @PuneCityPolice @ThaneCityPolice pic.twitter.com/WY5TSaKURZ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 13, 2022काय पातळी वर हे सगळे होते आहे ... ह्या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा @MumbaiPolice @CPMumbaiPolice @DGPMaharashtra @PuneCityPolice @ThaneCityPolice pic.twitter.com/WY5TSaKURZ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 13, 2022
निखिल शामराव भामरे ( वय 22 वर्षे, रा. पिंगळवाडे पोस्ट करंजाड, ता. सटाणा, जि. नाशिक, सध्या रा. आयोध्या पॅलेस, प्रभात नगर, मसरुळ, नाशिक ) याच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल केल्याने त्याला अटक करून नाशिक कारागृहात पाठविण्यात आले होते. दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेने नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून बुधवारी (दि. 18 मे) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ताबा घेतला.
नौपाडा पोलीस ठाण्यात होता गुन्हा दाखल - निखिल भामरेवर नौपाडा पोलीस ठाण्यात भा.दं.वी. 153, 153(ए), 107, 505 (2), 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने गुन्हे शाखेने नाशिकवरून ताबा घेतलेल्या निखिल भामरे याला ठाणे न्यायालयात नेले असता त्याला 114 दिवसाची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली.