ETV Bharat / city

Four jeans factories destroyed : ठाण्यात जीन्स पॅन्टचे अवैध चार कारखाने नेस्तनाबूत ; केडीएमसीची जेसीबी फिरवून कारवाई

सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे ( KDMC additional commissioner Aksha Guddhe ) आणि सुधीर मोकल यांनी विभागीय उपायुक्त सुधाकर जगताप ( Divisional commissioner Sudhakar Jagtap ) यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. कारवाई करण्यात आलेले कारखाने हे कल्याण पश्चिम येथील गोविंदवाडी परिसरातील खाडी किनारी भागात आहेत. हे चार कारखाने दोन ते तीन हजार स्क्वेअर फुटांमध्ये होते. 3 जेसीबी आणि प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी यांच्या मदतीने निष्कासित करण्याची धडक कारवाई आज करण्यात आली आहे.

author img

By

Published : Dec 18, 2021, 3:57 PM IST

Updated : Dec 18, 2021, 4:32 PM IST

Four jeans factories destroyed
Four jeans factories destroyed

ठाणे - जिल्ह्यात बंदी असूनही मोठ्या प्रमाणात जीन्स वॉशिंग उद्योगाकडून बेकायदेशीर कारखाने थाटण्यात आले आहेत. त्यातच महापालिका परिसरात अवैधरित्या कार्यरत असलेल्या जीन्स वॉशिंग उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कल्याण पश्चिम भागातील बेकायदा सुरू असलेले जीन्स पॅन्टचे चार कारखाने केडीएमसीने जेसीबी फिरवून जमीनदोस्त केले आहेत.

खाडी किनारी थाटले होते बेकायदा कारखाने
कारवाई करण्यात आलेले कारखाने अवैधरित्या चालू असलेल्या जीन्स वॉशिंग कारखान्यांवर कारवाई करण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या, कल्याण प्रादेशिक कार्यालयाकडे महापालिकेने पत्रव्यहावर केला होता. त्यांनतर कारखान्यांना कुठलीही परवानगी नसल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून महापालिकेला देण्यात आली होती. ही माहिती मिळताच महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अनधिकृतरित्या महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या जीन्स कारखान्यांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश ( Commissioner Vijay Suryawanshi directions on factories ) संबंधित प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांना दिले.

ठाण्यात जीन्स पॅन्टचे अवैध चार कारखाने नेस्तनाबूत

हेही वाचा-Police Appeal To Students: फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे सायबर पोलीसांचे आवाहन

दोन ते तीन हजार स्क्वेअर फुटांमध्ये होते कारखाने-

सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे ( KDMC additional commissioner Aksha Guddhe ) आणि सुधीर मोकल यांनी विभागीय उपायुक्त सुधाकर जगताप ( Divisional commissioner Sudhakar Jagtap ) यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. कारवाई करण्यात आलेले कारखाने हे कल्याण पश्चिम येथील गोविंदवाडी परिसरातील खाडी किनारी भागात आहेत. हे चार कारखाने दोन ते तीन हजार स्क्वेअर फुटांमध्ये होते. 3 जेसीबी आणि प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी यांच्या मदतीने निष्कासित करण्याची धडक कारवाई आज करण्यात आली आहे.

हेही वाचा-बेळगावात कलम १४४ लागू : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके, रमाकांत कोंडुसकर आणि इतर २७ जणांची हिंडलगा कारागृहात रवानगी

कारवाई वेळी तगडा पोलीस बंदोबस्त ...
कल्याण पश्चिम येथील गोविंदवाडी परिसर संवेदनशील असल्यामुळे महापालिकेने पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यामुळे या कारवाईसाठी परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त गुंजाळ यांनी सुमारे पंचवीस ते तीस पोलीस कर्मचारी उपलब्ध करून दिले होते. महापालिकेच्या 15 पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे अनाधिकृत कारखाने पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात ( Four jeans factories destroyed in Thane ) आले.

हेही वाचा-Shiv Sena Agitation Kolhapur : कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; कोल्हापुरात पडसाद

Last Updated : Dec 18, 2021, 4:32 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.