ठाणे - कळवा परिसरात असलेल्या एका मदरसामध्ये शिक्षण घेणारी पाच अल्पवयीन मुले मारकुट्या शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आपल्या गावी जाण्यासाठी निघाले ( Five children ran away from madrasa in kalva ) . त्यावेळी कलव्याहून कल्याणच्या दिशेने ट्रेनने प्रवास करत असताना एका दक्ष महिला प्रवाशाने याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली ( female passenger informed the railway police ). रेल्वे पोलिसांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात या पाच ही मुलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी संबंधित मदरसामधील दोन शिक्षकांविरोधात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत हा गुन्हा कळवा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
मुलांसोबत गैरप्रकार - १ ऑगस्ट रोजी एका ट्रेनमध्ये पाच अल्पवयीन मुले बसली होती. ही मुले बिहार येथे आपल्या गावी जाण्यासाठी निघाली. मात्र लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेने या मुलांची चर्चा ऐकली. त्यांच्या चर्चेवरून मुलांसोबत काही तरी गैरप्रकार झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने तात्काळ रेल्वे कंट्रोलला फोन करत याबाबत माहिती दिली .डोंबिवली जीआरपीने या पाच ही मुलांना तत्काळ डोंबिवली रेल्वे पोलीस स्थानकात ( Dombivli Lohmarg Police Station ) उतरवून ताब्यात घेतले.
शिक्षकांकडून मारहाण - पोलिसांनी विचारपूस केली तेव्हा ही सर्व मुले बिहार येथील असून त्यांना पुन्हा बिहारला जायचे होते. त्यांच्या कुटुंबाने त्यांना शिक्षण घेण्यासाठी कळवा येथील मदरसात पाठवले होते. मात्र त्या मदरसामध्ये शिक्षकांकडून त्यांना मारहाण करण्यात येत होती. त्यामुळे या मुलांनी तेथून पळ काढला. रेल्वे पोलीसांनी या मुलांना चाईल्ड वेल्फेर कमिटीसमोर हजर करण्यात आले असून त्यांची चौकशी केली. त्यांची रवानगी उल्हासनगर येथील बाल सुधार गृहात करण्यात आहे.
पोलिसांकडून तपास सुरू - या प्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात भादवी ३२४ व बाल हक्क कायदा ७५ अंतर्गत संबंधित मदरसाच्या दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हा कळवा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे डोंबिवली रेल्वे पोलिसांनी सांगितले ( case registered against two teachers ) . मात्र याबाबत कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिलाल आहे.
हेही वाचा - August Kranti : 'ऑगस्ट क्रांती' भारताच्या स्वातंत्र्याचा शेवटचा लढा; माहित आहे का तुम्हाला 'हा' इतिहास?