ETV Bharat / city

मेणबत्तीसह लोबानच्या गोदामाला भिवंडीत भीषण आग

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत लाखोंचा मेणबत्ती व लोबानचा साठा जळून खाक झाला होता.

मेणबत्ती कारखाना आग
मेणबत्ती कारखाना आग
author img

By

Published : Mar 3, 2021, 5:44 PM IST

Updated : Mar 3, 2021, 6:08 PM IST

ठाणे - ज्वालामुखीचा तालुक्यात आगीचे सत्र सुरु असून आज दुपारच्या सुमाराला पुन्हा मेणबत्तीसह लोबान साठवून ठेवलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील प्रेरणा कॉम्प्लेक्समधील गोदामात घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत लाखोंचा मेणबत्ती व लोबानचा साठा जळून खाक झाला होता.

इतर गोदामांनाही आगीची झळ पोहोचण्याआदीच आग आटोक्यात

विशेष म्हणजे लोबान (धूप) व मेणबत्तीचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने या साठ्याने आगीचा पेट घेतला आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. यामुळे गोदामाच्या लगत असलेल्या इतर गोदामांनाही आगीची झळ पोहोचण्याआदीच अग्निशामक दलाच्या जवानांची आग आटोक्यात आणल्याने कोट्यवधी रुपयाचे नुकसान टळले असून ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

यापूर्वीही दोन दिवसात अग्नीतांडवच्या चार घटना

ज्वालामुखीचा तालुका अशी नवीन ओळख निर्माण झालेल्या भिवंडी तालुक्यात अग्नीतांडव सुरूच असून शहर व ग्रामीण भागात सोमवार व मंगळवार या दोन दिवसात चार आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तर दुसरीकडे या आगीच्या सत्रामुळे शहर व गोदाम पट्यात राहणाऱ्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. चारही आगीच्या घटनांमध्ये एक लाकडाची वखार, यंत्रमाग कारखाना, कचऱ्याचा ढिगाऱ्यासह एक झोपडी अशा चार घटना घडल्या असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तर सुदैवाने या चारही घटनांमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.

Last Updated : Mar 3, 2021, 6:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.