ETV Bharat / city

डोंबिवलीत कपड्यांच्या दुकानांना भीषण आग, तीन ते चार दुकाने जळून खाक - डोंबिवलीत भीषण आग

डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्टेशन परिसरात शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या बाजुलाच असलेल्या रिस्पॉन्स या कापड दुकानाला अचानक आज दुपारी १ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणात कापड व लाकडी शोकेस असल्याने या आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले.

डोंबिवलीत कपड्यांच्या दुकानांना भीषण आग
डोंबिवलीत कपड्यांच्या दुकानांना भीषण आग
author img

By

Published : Apr 17, 2021, 1:46 PM IST

Updated : Apr 17, 2021, 3:26 PM IST

ठाणे : डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्टेशन परिसरात शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या बाजुलाच असलेल्या रिस्पॉन्स या कापड दुकानाला अचानक आज दुपारी १ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणात कापड व लाकडी शोकेस असल्याने या आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले.

3 ते 4 दुकाने जळून खाक

आग लागल्याचे लक्षात येताच कल्याण, डोंबिवली महापालिकेचे कर्मचारी अरुण जगताप आणि मिलिंद गायकवाड यांनी डोंबिवली अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच 4 अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत आगीत 3 ते 4 दुकाने जळून खाक झाली. दुसरीकडे आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याने, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला अडथळला निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

डोंबिवलीत कपड्यांच्या दुकानांना भीषण आग

लॉकडाऊनमुळे दुकानाचे बंद

दरम्यान लॉकडाऊनमुळे दरवाजे बंद असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहाणी झाली नाही. मात्र दुकानातील लाखो रुपयांचे कपडे व साहित्य जळून खाक झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, सध्या घटनस्थळी कुलिंगचे काम सुरु आहे.

हेही वाचा - कोरोना परिस्थिती पाहता कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवा; पंतप्रधान मोदींचे आवाहन..

Last Updated : Apr 17, 2021, 3:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.