नवी मुंबई - तुर्भे येथील जनता मार्केटमध्ये भीषण आग लागली. या आगीमध्ये जनता मार्केटमधील चार गाळे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. प्राथमिक माहिती नुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समजत आहे.
हेही वाचा... आता संजय राऊतांची तोफ भाजपविरोधात धडाडणार; राज्यसभेत शिवसेनेच्या आसन व्यवस्थेत बदल
आग लागल्याचे समजताच दुकान मालकांनी नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यास सुरूवात केली. मात्र आगीची तिव्रता वाढत गेल्याने अखेर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. ही आग पसरत गेल्याने चार दुकाने जळाली. अग्निशमन दलाचा गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्यानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे एपीएमसी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा... परदेशात नोकरीचे आमिष देऊन बेरोजगारांना लुटणाऱ्या तमिळनाडूच्या दोघांना अटक