नवी मुंबई - नवी मुंबईतील तुर्भे येथील एपीएमसी मार्केट जवळील युनियन बँक असलेल्या इमारतीला आज रात्री आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.
तुर्भे येथील सेक्टर 19 मधील एपीएमसी मार्केट कम्युनिटी एक्सचेंज बिल्डिंग माथाडी चौक जवळ युनियन बँके असलेल्या इमारतीला आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन जवानांच्या मार्फत आग विझवण्याचे काम चालू आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.
धुरामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं मुश्किल झालं आहे. संबंधित इमारतीत मोठ्या प्रमाणात कार्यालये आहेत. आज शनिवार असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इमारतींत फारसे कोणी नव्हते. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीबद्दल पुढील तपशील येणे बाकी आहे.