ETV Bharat / city

व्हाट्सअॅप स्टेटसमुळे वासनांध बापाचे फुटले बिंग; पोलिसांनी ठोकल्या बेड्या - ठाणे रेप न्यूज

पीडित मुलीने अत्याचाराची व्यथा तिच्या मोबाइलच्या व्हाट्सअॅपच्या स्टेटसवर ठेवली होती. याच स्टेटसमुळे नराधम बापाचे बिंग फुटले. मुलीच्या आई व नातेवाईकांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन पीडितेवर घडलेल्या प्रसंगाचे कथन करतातच अत्याचारी बापाविरोधात भा. दं. वि. कलम ३७६, ३५४, ३२३, ५०६ पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे रेप
ठाणे रेप
author img

By

Published : Oct 6, 2021, 5:01 PM IST

ठाणे - बाप-मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय वासनांध बापाने पोटच्या अल्पवयीन मुलीलाच आईला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचारी बापाचा त्रास असाह्य झाल्याने पीडितेने तिच्या व्हाट्सअॅपच्या स्टेटसवरून वासनांध बापाचे बिंग फोडले आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

दारूच्या नशेत धमकावत पीडितेवर अत्याचार

पीडित मुलगी उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत आई व आरोपी बापासोबत राहते. वासनांध बाप मे महिन्यापासून कोणत्या ना कोणत्या बहाण्याने पीडित मुलीशी अश्लील चाळे करीत होता. मात्र काही दिवसांपूर्वी वासनांध बापाने दारूच्या नशेत धुंद होऊन दुपारच्या सुमारास घरात दुसरे कोणी नसल्याचा फायदा घेऊन पोटमाळ्यावर अल्पवयीन पीडित मुलीचे हात, तोंड दाबून अत्याचार केला. त्यांनतर जर कोणाला घडलेला प्रकार सांगितला तर तुझ्या आईला जिवे मारेन, अशी धमकी दिली. या धमकीमुळे पीडित मुलगी भयभीत झाली. याचाच फायदा घेऊन नराधम बाप तिच्यावर वारंवार अत्याचार करीत होता.

विविध कलमांतर्गत गुन्हा

असह्य झालेल्या पीडित मुलीने अत्याचाराची व्यथा तिच्या मोबाइलच्या व्हाट्सअॅपच्या स्टेटसवर ठेवली होती. याच स्टेटसमुळे नराधम बापाचे बिंग फुटले. मुलीच्या आई व नातेवाईकांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन पीडितेवर घडलेल्या प्रसंगाचे कथन करतातच अत्याचारी बापाविरोधात भा. दं. वि. कलम ३७६, ३५४, ३२३, ५०६ पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या आधारे त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक शंकर शिंदे करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.