ठाणे - कल्याणच्या रेल्वे स्थानकावर आज (मंगळवारी) काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. चुकून चढलेल्या रेल्वेतून उतरताना दोघा प्रवाशांना एमएसएफ जवान सोमनाथ महाजन आणि एसआईपीएफ के. साहू या दोघांनी रेल्वेखाली जाण्यापासून वाचवले. हा धक्कादायक प्रकार रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे जीव वाचवलेले दोघेही बाप-लेक असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - मद्यपी चढला मोबाईल टाॅवरवर...म्हणाला, हा तर दहीहंडीचा सराव
कल्याण स्टेशनहुन पवन एक्सप्रेस ही ट्रेन पकडण्यासाठी आलेले दिलीप मांडगे हे आपल्या मुलासह चुकून कामयानी एक्सप्रेसमध्ये चढले. गाडी सुरू झाल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या मुलाच्या लक्षात आले की, आपण चुकीच्या गाडीत चढलो आहोत. त्यामुळे मांडगे आणि त्यांच्या मुलाने चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या हातात समान असल्याने आणि गाडीच्या वेगाचा अंदाज न आल्याने तोल गेला आणि ते दोघे बाप-लेक प्लॅटफॉर्मवर पडले. चालत्या एक्सप्रेसखाली जाणार इतक्यात प्लॅटफॉर्म उपस्थित असलेल्या एमएसएफ जवान सोमनाथ महाजन आणि एसआईपीएफ के. साहू यांनी प्रसंगावधान राखून दिलीप व त्यांच्या मुलाला चालत्या रेल्वे खाली जाण्यापासून वाचवले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.