ठाणे - महाराष्ट्रात ४ वर्षे आम्ही राहतो. पण अद्याप हक्काचे घर मिळाले नाही. तर दुसरीकडे म्हाडा कोकण मंडळाच्या रूपाने बाळकुम येथे विजेती पदाची लाॅटरी २०१८ साली लागली होती. त्याचा ताबा पार्किंगचा म्हाडा आणि ठाणे महापालिकेच्या आपसातील तांत्रिक नियमांमुळे अडकला असून त्यासाठी आम्ही २१५ मध्यमवर्गीय कुटुंबांनी भुर्दंड का म्हणून द्यावा असा संतप्त सवाल लॉटरी विजेत्यांची ठाणे महापालिका आणि म्हाडाला केला आहे.
ठाणे बाळकुम येथील मध्यम उत्पन्न गटासाठी घरांची लॉटरी २०१८ मध्ये काढली होती. त्यावेळी म्हाडाची दोन घरांसाठी एक पार्किंग अशी नियमावली होती. तर ठाणे मनपाच्या २०१९ च्या नियमानुसार प्रत्येक घरामागे एक पार्किंग याप्रमाणे आम्हाला १० लाख रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहेत. कोव्हीडमुळे आमची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे आम्हाला २०१८ मधील म्हाडाच्या मूळ कागदपत्राप्रमाणे जो अर्ज भरला होता. त्याच किंमतीत ताबा मिळावा, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे करणार असल्याचे सदस्य मनिष सावंत यांनी सांगितले.
मंत्रालय-मंत्र्यांच्या घरी आणि म्हाडामध्ये घातल्या फेऱ्या -
विजेत्यांची 2018 पासून सर्व यंत्रणांना घरासाठी जाब विचारला. मात्र म्हाडा ठाणे महानगर पालिकेकडे बोट दाखवत आहे. तर पालिका म्हाडाला जवाबदार ठरवत आहे. या लॉटरी विजेत्यांची आतापर्यंत जितेंद्र आव्हाड यांना घरी भेटून व्यथा सांगितली. पण त्यावर काही झाले नाही. मंत्रालायात गेल्यावर म्हाडा कार्यलयात त्यांना पाठवण्यात आले. त्यानंतर म्हाडा कार्यालयाने त्यांना ठाणे महापालिकेत पाठवले आहे. आता हे थांबवा आणि आम्हाला आमची घर द्या अशी मागणी 215 कुटुंब करत आहेत.
अतिरिक्त रकमेचा बोजा
म्हाडाने बाळकुम मध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी बांधलेल्या इमारतीत पार्किंगच्या तांत्रिक मुद्द्यावरून ठाणे महापालिका व म्हाडा यांच्यात नियमाच्या वादाची गेल्या दोन वर्षापूर्वी ठिणगी पडली आणि पालिकेने या निवास इमारतींना एनओसी दिली नाही. येत्या काही महिन्यात पालिकेच्या नियमानुसार म्हाडा पार्किंगचे काम पूर्ण करेल यानंतर विजेत्यांना पार्किंगची सेवा म्हणून दहा लाख रुपये अतिरिक्त रक्कम देऊन घरांचा ताबा दिला जाईल असे म्हाडा ने कळवले आहे. विजेत्यांकडे आता एवढे पैसे भरण्यासाठी नाही म्हणून हा विषय रेंगाळत पडला आहे.