ETV Bharat / city

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आमदारांसह ठाण्यात; मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आपल्या समर्थक आमदारांसह प्रथमच ठाण्यात आले होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री झालेलं असतानाही त्यांनी स्वतंत्र गाडीने न येता शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह एका बसने मुंबईवरून निघाले आणि रात्री ठाण्यात आले. मुख्यमंत्री येणार म्हणून दुपारपासूनच शिंदे समर्थक शिवसैनिक आनंदनगर चेकनाका परिसरात जमा झाले होते .

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Jul 5, 2022, 8:15 AM IST

ठाणे : जिल्ह्याचे नेते एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतल्यानंतर सोमवारी प्रथमच ठाण्यात आले होते. एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह टेम्भी नाक्यावरील आनंद आश्रम आणि आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन दर्शन घेतले आहे. आनंद नगर प्रवेशद्वारापासून शिंदे समर्थकांनी स्वागताची जय्यत तयारी केली होती. हार, फुले, पुष्पहाराने या सर्वाचे स्वागतसाठी आणले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्यातून अनेक शिंदे समर्थकानी हजेरी लावली होती. यावेळी संपूर्ण ठाणे शहरात एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे पोस्टर्स देखील लावण्यात आले. यावेळी शिंदे समर्थक शिवसैनिकांनी नव्या मुख्यमंत्र्याचे स्वागत केले वरूनराजाने देखील यावेळी हजेरी लावली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर स्वागतची जय्यत तयारी केली होती. तब्बल १३ दिवसानंतर शिंदे हे ठाण्यात आले असून त्यात मुख्यमंत्री पद घेऊन आल्याने मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी शिंदे ठाण्यात ज्या- ज्या ठिकाणी भेट देणार आहेत. त्या- त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला नाही. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणार, म्हणुन आनंद नगर जकात नाका येथून बाईक रैली काढण्यात आली.

मुख्यमंत्री आमदारांसह एकाच बसने ठाण्यात - मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह प्रथमच ठाण्यात आले होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री झालेलं असतानाही त्यांनी स्वतंत्र गाडीने न येता शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह एका बसने मुंबईवरून निघाले आणि रात्री ठाण्यात आले. मुख्यमंत्री येणार म्हणून दुपारपासूनच शिंदे समर्थक शिवसैनिक आनंदनगर चेकनाका परिसरात जमा झाले होते. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकताच प्रथम चेत्यभूमीवर जावून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर शिवाजीपार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena chief Balasaheb Thackeray ) यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. तिथून ते आमदारांसह ठाण्यात येऊन त्यांनी आनंद दिघे यांचे स्मृतिस्थळ असलेल्या शक्तिस्थळावर जाऊन भर पावसात दर्शन घेतले. यावेळी मुसळधार पावसात हजारो शिंदे समर्थक शिवसैनिक उपस्थित होते.

मुसळधार पाऊस, जल्लोष त्यात वाहतूक कोंडी - सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांसह ठाण्यात दाखल झाले होते. त्यामुळे त्याच्याबरोबर मोठ्या प्रमाणावर ताफा होता, पोलीस, सुरक्षा रक्षकांची वाहने असल्याने चौहुबाजूने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आनंद नगर, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन ते थेट सिव्हिल रुग्णालय मार्गी आनंद दिघे यांचे स्मृतिस्थळ गाठले. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मार्गावरील रस्ते बंद करण्यात आले होते. ठाण्यात सोमवारी मुसळधार पाऊस ( torrential rain) त्यात मुख्यमंत्री पहिल्यादा आमदारसह आले असल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

विकासकामांना ब्रेक लावणार नाही : घाईगडबडीत मजूर झालेले प्रस्ताव स्थगित करत आहोत.आमचे सरकार नियमानुसार काम करणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. राज्यात नवे सरकार आल्यापासून आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला ब्रेक लावण्याचा धडाका लावला आहे का या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना बोलताना त्यांनी सांगीतले की, सरकारने काही निर्णय घेत विकास आराखड्यांना ब्रेक लावला आहे. एक एप्रिलनंतरच्या विकास आराखड्यांना या सरकारने स्थगिती दिली आहे.

हेही वाचा - CM On VAT Of Petrol : जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करु - मुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.