ठाणे - दोन मंत्री सहा आमदार दोन खासदार एवढे सगळे नेतृत्व ठाण्याला लाभला असताना देखील ठाणे महानगरपालिकेचे प्रशासन कशा पद्धतीने काम करते याचा धडधडीत आढावा घेण्यात आलेला आहे. 31 मे ची डेडलाईन संपून देखील आजपर्यंत रस्ते दुरुस्ती आणि नालेसफाई ही पूर्णपणे झालेले नाहीय आणि यामुळेच प्रशासन काय करते आहे, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.
ठाणे महापालिका गेले अनेक दिवस विरोधकांच्या रडारवर आहे. याच कारण ही तसेच आहे. पावसाळ्याचा महिना अर्धा सरळ तरी पण नालेसफाई आणि रस्त्यांची दुरावस्था जैसे थे आहे. अशी भयानक परिस्तिथी असूनदेखील पालिका आयुक्त मात्र काम १०० टक्के पूर्ण झाल्याचा दावा करत आहेत. ठाण्यातील मुख्य परिसरात तीन हाथ नका, नितीन कंपनी अश्या रहदारीच्या मुख्य मार्गांवरील रस्त्यांची काम अजूनही रखडली आहे. पावसाचे दिवस असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. मात्र, पालिका प्रशासन या सर्वाकडे दुर्लक्ष करताय की महापालिका आयुक्तांच्या डोळ्यात धूळ फेकली जाते, असा प्रश्न ठाणेकर नागरिकांना भेडसावतो आहे. दरवेळी पावसात ठाणेकरांना पाणी साचण्याची भीती असते. मात्र, दर वर्षी प्रमाणे याही वर्षी ठाणेकर नागरिकांच्या जीवाशी महापालिका प्रशासन खेळात असल्याचं धक्कादायक चित्र समोर येत आहे. एकीकडे १०० टक्के नालेसफाई झाली, असा दावा तर दुसरीकडे तुंबलेल्या नाल्यांची खरी परिस्तिथी या पावसात ठाणेकरांना वाहून घेऊन जाते की काय असच वास्तव दिसत आहे. त्यामुळे हा पावसाळा ठाणेकरांना काही नवीन विघ्न आणणार हे पाहावं लागेल.
कुठे कुठे काम रखडली - ठाण्यात अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्ती आणि नालेसफाईचा बोजवारा उडाला आहे. यात नवीन पासपोर्ट कार्यालय, कळवा, मुंब्रा,, दिवा, होलीक्रॉस, स्कूल या ठिकाणी नाल्याची साफसफाई झालेली नाही आणि तरीदेखील प्रशासन नालेसफाई 100 टक्के झाली असल्याचे सांगत आहे, अशीच परिस्थिति रस्ता दुरुस्तीची देखील आहे. ठाण्यात अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी खोदलेले आहेत. त्यांचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यांनादेखील कामाची अंतिम मुदत 31 मेची होती. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे या वर्षीदेखील लोकांच्या घरात पाणी जाणार आणि दुरुस्ती सुरु असलेल्या रस्त्यावर अपघात होणार, असा विश्वास नागरिक वक्त करत आहेत.
हेही वाचा - Vidhan Parishad Election 2022 : हॉटेल पॉलिटिक्समध्ये आमदारांसाठी कोट्यावधींचा चुराडा; तरीही धाकधुक कायम