ETV Bharat / city

डोंबिवलीच्या रेल्वे उड्डाणपुल संदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय - रेल्वे उड्डाणपुल

उड्डाणपूलावरील वाहतूक २७ मे पासून बंद केली तर, डोंबिवलीत वाहतुकीची मोठी कोंडी होणार आहे. कारण, जोशी हायस्कूल बाजूला बांधण्यात आलेला नवा पूलावर अवजड वाहनांना बंदी आहे.

उड्डाणपूलकोपर उड्डाणपूल
author img

By

Published : May 21, 2019, 5:31 PM IST

ठाणे - डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर उड्डाणपूल आहे. ४० वर्षापूर्वी उभारण्यात आलेला हा पूल २७ मे पासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्देश मध्य रेल्वे विभागीय प्रबंधकांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला दिला आहे. यामुळे डोंबिवली शहरवासीयात खळबळ माजली आहे. हा पूल बंद झाला मोठी वाहतूक समस्या निर्माण होणार आहे.

कोपर उड्डाणपूल, डोंबिवली
मध्य रेल्वेचे अभियंते डी. डी. लोलगे यांनी पालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांना पत्र पाठवले आहे. डोंबिवलीतील रेल्वेवरील उड्डाणपुलाचे आयआयटी मुंबई यांनी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. त्या अहवालामध्ये पुलाच्या दुरुस्ती संबंधी शिफारस करण्यात आली आहे. यासाठी २७ मे २०१९ पासून पूल वाहतूकीसाठी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ऑगस्ट २०१७ मध्येही डोंबिवलीचे स्ट्रक्चरल ऑडिटर माधव चिकोडी यांनीही पुलाचे ऑडिट केले होते. पुलावरील जाहिरातीचे मोठे फलक तातडीने काढण्याची सूचना त्यांनी केली होती. पुलाला काही ठिकाणी राजाजी पथाच्या दिशेला तडे गेले होते, त्याची दुरुस्ती करण्यात यावी. पुलावरील गवत काढून टाकावेस, अशा सूचना केल्या होत्या.

उड्डाणपूलावरील वाहतूक २७ मे पासून बंद केली तर, डोंबिवलीत वाहतुकीची मोठी कोंडी होणार आहे. कारण, जोशी हायस्कूल बाजूला बांधण्यात आलेला नवा पूलावर अवजड वाहनांना बंदी आहे. जुन्या पुलावरुन हलक्या वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी दिल्यास बराच प्रश्न कमी होणार आहे. यासंदर्भात महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी म्हणाल्या, महापालिकेस फक्त पत्र प्राप्त झाले आहे. आयआयटीचा अहवाल प्राप्त झाला नाही. तो प्राप्त झाल्यावर त्यासंबंधात निर्णय घेण्यात येईल. मात्र, रेल्वे प्रशासनाने पत्रासोबतच अहवाल पाठविल्याचा दावा केला आहे. यामुळे महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्यात वाद होण्याची चिन्हे आहेत.

डोंबिवलीच्या रेल्वे उड्डाण पुलासंदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय

ठाणे :- डोंबिवली पूर्व  पश्चिम जोडणारा कोपर उड्डाण पूल चाळीस वर्षापूर्वीचा उड्डाणपूल दुरुस्तीसाठी येत्या 27 मे पासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्देश मध्यरेल्वे विभागीय प्रबंधक यांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेस दिले आहे. यामुळे डोंबिवलीत खळबळ माजली आहे. डोंबिवलीत सध्या वाहतूक कोंडीची समस्या असतांना जर हा पूल बंद झाला तर मोठा हाहाकार उडणार आहे. मात्र या संदर्भात पालिका प्रशासनाने रेल्वेचे केवळ पत्र प्राप्त झाले आहे. आयआयटीचा अहवाल प्राप्त झाला नाही तो प्राप्त झाल्यावर त्यासंबंधात निर्णय घेण्यात येईल.

मध्य रेल्वेचे अभियंते डी. डी. लोलगे यांनी पालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांना पत्र पाठवले असून डोंबिवलीतील रेल्वेवरील उड्डाणपुलाचे आयआयटी मुंबई यांनी पुलाचे स्टक्चरल ऑडीट केले असून त्या अहवालामध्ये पुलाच्या दुरुस्ती संबंधी शिफारस केली आहे. व यासाठी 27 मे, 2019 पासून पूल वाहतूकीसाठी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

ऑगस्ट 2017 मध्ये डोंबिवलीचे स्टक्चरल ऑडीटर माधव चिकोडी यांनीही या पुलाचे ऑडीट केले होते. व त्यामध्ये पुलावरील जाहीरातीचे मोठे फलक तातडीने काढण्याची सूचना केली होती. तसेच पुलाला काही ठिकाणी राजाजी पथाच्या दिशेला तडे गेले होते त्याची दुरुस्ती करण्यात यावी. पुलावरील गवत आहे ते काढून टाकावे अशा सूचना केल्या होत्या. कोपर येथील हा उड्डाणपुल सुमारे 40 वर्षांपूर्वीचा असून पालिका प्रशासन या पुलाकडे योग्य प्रकारे देखभाल दुरुस्ती करत नसल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले होते.

27 मे पासून जर पुलावरील वाहतूक बंद केली तर डोंबिवलीत वाहतुकीची मोठी कोंडी होणार आहे. कारण जोशी हायस्कूल बाजूला जो नवा पूल बांधण्यात आला आहे तो अवजड वाहनांसाठी योग्य नसल्याने त्या वाहनास बंदी आहे. किमान या जुन्या पुलावरून हलक्या वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी दिल्यास बराच प्रश्न कमी होणार आहे. यासंदर्भात महापालिकेचे शहर अभियंते सपना कोळी यांच्याशी संपर्क साधला असता महापालिकेस फक्त पत्र प्राप्त झाले असून आयआयटीचा अहवाल प्राप्त झाला नाही तो प्राप्त झाल्यावर त्यासंबंधात निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. मात्र रेल्वे प्रशासन पत्रासोबतच अहवाल पाठविल्याचा दावा करीत आहे. यामुळे महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्यात वाद होण्याची चिन्हे आहेत. 

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.