ETV Bharat / city

ठाण्यातील आरोग्य दूत आषाढी वारीत वारकऱ्यांची करतायेत सेवा; 36 वर्षांची पंरपरा - डॉक्टर्स

वारकऱ्यांवर औषधोपचार करून विठुरायाची सेवा करण्याचे काम ठाण्यातील डॉक्टर अविरतपणे करत आहेत.

ठाण्यातील आरोग्य दूत आषाढी वारीत वारकऱ्यांची करतायेत सेवा; 36 वर्षांची पंरपरा
author img

By

Published : Jul 9, 2019, 5:57 PM IST

ठाणे - शहरातील डॉक्टरांची एक संघटना मागील 36 वर्षांपासून वारीमध्ये वारकऱ्यांना आरोग्य सेवा देत आहेत. वारकऱ्यांवर औषधोपचार करून विठुरायाची सेवा करण्याचे काम ठाण्यातील डॉक्टर अविरतपणे करत आहेत. या वर्षीदेखील डॉक्टरांनी आपला हा उपक्रम सुरू ठेवला आणि हजारो वारकऱ्यांना आपली सेवा पुरवली.

संत शिरोमणी ज्ञानोबारायांची शाही पालखी लाखो वैष्णवांसह माऊली, माऊली नामाचा अखंड जयघोष करत सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे दाखल झाली. पहाटेपासून हजारो वारकरी भाविक मार्गक्रमण करत होते. लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे पायी येतात आणि अशा ईश्वर भक्तांची सेवा करणे म्हणजे त्या परमेश्वराचीच सेवा करण्यासारखे असते. भूक, वेदना, पीडा, वय, आजार कसलीही पर्वा न करता हे भक्तगण दिंडीसोबत जात असतात. अशा माऊलींना सह्याद्री मानव सेवा मंचतर्फे दरवर्षी मोफत आरोग्य सेवा देण्यात येते.

ठाण्यातील आरोग्य दूत आषाढी वारीत वारकऱ्यांची करतायेत सेवा; 36 वर्षांची पंरपरा

दिवे घाट, सासवड करत मेडिकल कॅम्प नातेपुते येथे संपन्न झाला. येथे मुख्यत्वे शारीरिक आजार, जलजन्य आजार, त्वचारोग, जखमा व इतर आजार अशा सर्व प्रकारच्या उद्भवणाऱ्या आजारांवर मोफत उपचार करण्यात आले. औषधांबरोबरच, वेदनाशामक तेल, छोट्या शस्त्रक्रियाही येथे करण्यात आल्या. या वैद्यकीय शिबीरास संस्थापक सर्जन डॉ. विश्वास सापटणेकर, डॉ. राजेश मढवी तसेच इतर सेवाभावी डॉक्टर, संस्थेचे सेवाभावी कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.

Intro:ठाण्यातील आरोग्य दूत वारीत सेवेसाठी हजर 36 वर्षांपासून सुरू आहे आरोग्यसेवाBody:
डॉक्टर आणि माणुसकी याचा फार जवळून संबंध ठाण्यातील एकाच डॉक्टरांच्या संघटनेने वारीमध्ये दाखवलाय मागील 36 वर्षांपासून वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करून त्यांच्यावर औषधोपचार करून विठुरायाचा दर्शन घेण्याचे काम ठाण्यातील डॉक्टर अविरतपणे करत आहेत या वर्षीदेखील ठाण्यातल्या डॉक्टरांनी आपला हा उपक्रम सुरू ठेवला आणि हजारो वारकऱ्यांना आपली सेवा पुरवली अहोरात्र चालणाऱ्या वारकऱ्यांना ज्या समस्या येत होत्या त्या सोडविण्याचे काम या डॉक्टरांनी केलं.
श्रीसंत शिरोमणी ज्ञानोबारायांची शाही पालखी लाखो वैष्णवांसह माऊली माऊली नामाचा अखंड जयघोष करीत सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे प्रवेश केला .पहाटेपासून हजारो वारकरी भाविक मार्गक्रमण करीत होते लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे पायी येतात आणि अशा ईश्वर भक्तांची सेवा करणे म्हणजे त्या परमेश्वराचीच सेवा. भूक,वेदना ,पीडा,वय,आजार कसलीही पर्वा न करता हे भक्तगण हे दिंडी सोबत जात असतात. अशा माऊलींना सह्याद्री मानव सेवा मंच तर्फे दरवर्षी मोफत आरोग्य सेवा देण्यात येते .दिवे घाट , सासवड करीत मेडिकल कॅम्प नातेपुते येथे संपन्न झाला. येथे मुख्यत्वे शारीरिक आजार, जलजन्य आजार , त्वचारोग ,जखमा व इतर आजार अशा सर्व प्रकारच्या उद् भवणाऱ्या आजारांवर मोफत उपचार करण्यात आले. औषधांबरोबरच ,वेदनाशामक तेल ,छोट्या शस्त्रक्रिया ही येथे करण्यात आल्या.या वैद्यकीय शिबीरास संस्थापक सर्जन डॉ.विश्वास सापटणेकर , डॉ.राजेश मढवी तसेच इतर सेवाभावी डॉक्टर ,संस्थेचे सेवाभावी कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.
Byte डॉक्टर राजेश मढवी आयोजक
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.