ठाणे - दिवाळी म्हटली कि बाजारपेठ फुलतात ती रंगीबेरंगी आणि आकर्षक कंदिलांनी. अशीच आकर्षक आणि पारंपरिक कंदील तयार केली आहेत, ठाण्यातील अपंग मैत्री या संस्थेतील दिव्यांग नागरिकांनी, या कंदिलांची विक्री करण्यासाठी ठाणे पुर्व भागात प्रदर्शन देखील भरवण्यात आले आहे. ठाणेकर नागरिकांनी देखील या कंदिलांना चांगलीच पसंती दिली आहे.
दिव्यांग नागरिकांच्या हाताला रोजगार मिळावा आणि त्यातुन दोन पैसे कमावता यावे, या उद्देशाने अपंग मैत्री संस्था नेहमीच अशा प्रकारचे उपक्रम राबवत असते. यंदा या संस्थेच्या दिव्यांग नागरिकांनी पारंपरिक कंदील बनवण्याचं काम हाती घेतलंय. या कंदिलांच्या विक्रीसाठी ठाणे पुर्व कोपरी भागातील अष्ट विनायक चौक याठिकाणी प्रदर्शन देखील भरवण्यात आलं आहे. दिव्यांग नागरिकांनी बनवलेल्या या कंदिलांना ठाणेकर नागरिक चांगला प्रतिसाद देखील देतांना पाहायला मिळत आहे. दिव्यांग नागरिकांनी बनवलेले कंदील ठाणेकरांनी विकत घेऊन त्यांच्या रोजगाराला प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून भविष्यात सर्वच दिव्यांग नागरिक आपला स्वतःचा व्यवसाय करु शकतील आणि जगण्याची नवी प्रेरणा त्यांना मिळेल अशा भावना संस्थेचे सचिव विकास हळदणकर आणि दिव्यांग नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
दिव्यागांना मिळतं समाधान -
कोणत्या प्रकारची चूक नसताना निसर्गाच्या या अडचणीमुळे दिव्यांगांना आनंद साजरा करण्याची संधी मिळत नाही दीपावलीच्या निमित्ताने अशा पद्धतीने त्यांना एक संधी मिळते या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून अशाच प्रकारे आनंद देण्याचा प्रयत्न वर्षभर झाल्यास दिव्यांगांना कोणत्याही प्रकारे अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.