ठाणे - आत्मामालिक ध्यानपीठ यांच्यावतीने रविवारी शहापुरमध्ये ध्यान योग शिबीर निमंत्रण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. दिंडीत पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिलांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या दिंडीचे स्वरूप पाहून शहापूरकर भारावले होते. या अनोख्या निमंत्रण दिंडीचे संपूर्ण शहापूर तालुक्यात कौतुक होत आहे.
हेही वाचा... लष्करी वाहनावर दहशतवादी हल्ला, सर्व जवान सुरक्षित
शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई येथे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित, आत्मामालिक ध्यानपिठ आहे. या ध्यानपीठाच्या वतीने आत्मामालिक ध्यान योग शिबीर (नववर्ष आत्मोत्सव २०१९-२०) साठी निमंत्रण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शहापूर शहरातून या दिंडीची सुरवात झाली. यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी दिंडीचे स्वागत केले. त्यानंतर शहापूर शहरातील विविध भागातून ही दिंडी भावासे, मोहिली-अघई, आबिटघर येथे गेली. या ठिकाणी गेल्यावर दिंडीच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या नागरिकांना शिबिराची माहिती दिली गेली.
हेही वाचा... 'सीएए व एनआरसीवरुन शहरी नक्षलवादी पसरवत आहेत अफवा'