ETV Bharat / city

Rahul Gandhi in Bhiwandi court : खासदार राहुल गांधींवरील मानहानी प्रकरणाची सुनावणी भिवंडी जलदगती न्यायालयात होणार - Bhiwandi fast track court

भिवंडी येथील सोनाळे गावात गेल्या वर्षी 6 मार्च रोजी राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली होती. या सभेत बोलताना, महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याविरोधात, संघाचे भिवंडी तालुका कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार नोंदवून राहुल यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. गेल्या 7 वर्षापासून सुरु असलेल्या मानहानी प्रकरणाची सुनावणी आता भिवंडी जलदगती ( Rahul Gandhi in Bhiwandi fast track court ) न्यायालयात होणार आहे. त्यामुळे लवकर निकाल लागण्याची शक्यता आहे.

Rahul
राहुल
author img

By

Published : Jan 29, 2022, 7:47 PM IST

ठाणे - खासदार राहुल गांधी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत ( Rahul Gandhi statement against RSS ) वक्तव्य केले होकी, आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली. यामुळे आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होऊन प्रलंबित दाव्याची भिवंडी जलदगती न्यायालयातच 5 फ्रेब्रुवारीपासून दरोरोज सुनावणी ( Rahul Gandhi in Bhiwandi fast track court ) केली जाणार असल्याचे आदेश भिवंडी न्यायालयाचे न्यायाधीश जे. व्ही पालीवाल यांनी दिले आहे. यामुळे गेल्या 7 वर्षापासून सुरु असलेल्या मानहानी दाव्याचा निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पक्षकारांच्या दोन्ही वकिलांची बाजू घेऊन आदेश -

आज भिवंडी न्यायालयात सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या एका दाव्याचा हवाला देत, निवडून आलेल्या प्रतिनिधींशी संबंधित खटले जलद गतीने चालवायचे आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांवर आधारित राहुल गांधींवरील दावाही त्याच श्रेणीत येत असल्याने हा दावा वर्गीकृत केल्याचे नमूद केले. त्यामुळे हा दावा प्राधान्याने आणि जलदगतीने चालवावा आणि दैनंदिन सुनावणी व्हावी, अशी इच्छा होती. यावर न्यायधीशांनी दोन्ही वकिलांची तयारी विचारली असता तक्रारदारातर्फे अॅड. प्रबोध जयवंत तर राहुल गांधींचे वकील अॅड. नारायण अय्यर, यांनी फास्ट ट्रॅकिंग आणि दैनंदिन सुनावणीसाठी तयारी दाखवली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात दावा दाखल केला होता. कुंटे यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांनी आरएसएसच्या संदर्भात केलेले भाषण प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह होते. तर राहुल गांधी यांचे वकील अॅड. नारायण अय्यर यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आजच्या आदेशानंतर या प्रकरणाची दररोज सुनावणी होणार आहे. 2017 पासून हा दावा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात जात आहेत. मात्र जलदगती न्यायालयात सुनावणी होईल, असे ते म्हणाले.

काय आहे प्रकरण -

भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथील मैदानावर झालेल्या 2014 साली लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत राहूल गांधी यांनी महात्मा गांधींजींची हत्या आरएसएसनेच घडवून आणली, असे खळबळजनक वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी आरएसएसचे शहर जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेविरोधात राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून सदरच्या याचिकेची सुनावणी दिल्ली न्यायालयात करण्याची विनंती केली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रासोबत भाषणातील उतारा दाखल केला होता. तो उतारा भिवंडी कोर्टात पुरावा म्हणून दाखल करून घ्यावा, असा अर्ज याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी न्यायालयाकडे केला होता. परंतू मागील 12 जून 2018 रोजी भिवंडी न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी राहूल गांधी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते. तसेच राहुल गांधी यांच्या वकीलांनी ही याचिका समन्स ट्रायलप्रमाणे चालविण्याची मागणी केली होती. तसेच उच्च न्यायालयातील कागदपत्रे भिवंडी न्यायालयांत दाखल करून घेण्यास न्यायालयास विरोध दर्शविला होता. त्यावेळी ही याचिका समन्स ट्रायलप्रमाणे चालविणयास न्यायालयाने मान्यता दिली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.