ETV Bharat / city

ऑनलाइन गुन्हे रोखण्याकरता सायबर तज्ज्ञाकडून नागरिकांमध्ये जागृती - ठाणे सायबर गुन्हे न्यूज

सोशल मीडियावर अश्लील मेसेज अथवा व्हिडीओ क्लिप टाकून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्नकरणात वर्षभरात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात २५ आरोपांना अटक केल्याची माहिती सायबर सेल विभागाच्या पोलिसांनी दिली आहे.

सायबर गुन्हे
सायबर गुन्हे
author img

By

Published : Jan 7, 2021, 7:08 PM IST

ठाणे - ऑनलाइन शॉपिंग व चॅटींग करताना आपली एक चूक महागात पडू शकते. याविषयी माहिती देण्यासाठी शहरातील विविध पोलीस ठाण्यांत सायबर गुन्हे विषयक मार्गदर्शक शिबिर घेण्यात आले.

सोशल मीडियावर अश्लील मेसेज अथवा व्हिडीओ क्लिप टाकून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्नकरणात वर्षभरात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात २५ आरोपांना अटक केल्याची माहिती सायबर सेल विभागाच्या पोलिसांनी दिली आहे.

सायबर तज्ज्ञाकडून नागरिकांमध्ये जागृती
नागरिकांनी ऑनलाईन प्रलोभनांना बळी पडू नये ... हॅकर्सकडून सर्वसामान्य व्यक्तीची फसवणूक होऊन बँक ग्राहकाच्या बँक खात्यातून रक्कम काढण्यात येते. आपण काही नियमांचे पालन केल्यास यावर अंकुश बसू शकतो, असे मत सायबरतज्ज्ञांनी शिबिरात व्यक्त केले आहे. सोशल मीडियाद्वारे मैत्री करून नंतर गिफ्ट देण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूकही केली जाते. अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाच्या आमिषाने त्यांची फसवणूक करण्याचेही प्रकार घडतात. अशा प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहनही यावेळी नागरिकांना पोलीस अधिकाऱ्याकडून करण्यात आले. गुन्हे दाखल झाल्यानंतर पुढे काय?सायबर गुन्ह्यांसंबंधी २०१९ मध्ये ठाणे आयुक्तालयात ६० गुन्ह्यांची नोंद झाली. त्यातील १७ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. या प्रकरणांमध्ये १८ आरोपींना अटक झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान ४६ गुन्हे नोंद झाले आहेत. यामधील नऊ गुन्हे उघड झाले असून सात जणांना अटक केल्याचे माहिती समोर आली आहे. वर्षात सर्वाधिक गुन्हे कुठले घडले? वर्षभरात सायबर सेलमध्ये फेसबुकवर अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याचे गुन्ह्यांमध्ये प्रमाण अधिक होते. याशिवाय फेसबुकवर बनावट खाते सुरू करून खातेधारक आजारी किंवा अडचणीत असल्याची बतावणी करीत त्यांच्या मित्रांकडे पैशांची मागणी केली जाते. असे गुन्हे सर्वाधिक घडले आहेत. त्यामुळे अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विविध पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे निरीक्षक, सायबर सेलचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर घेण्यात आल्याचे डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी सांगितले. या शिबीराला मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकरांनी सहभाग घेतला होता. वर्षभरात घडलेले गुन्हे

महिना गुन्हे संख्या
जानेवारी -६
फेब्रुवारी -५
मार्च -३
एप्रिल -४
मे -६
जून -१
जुलै -१
ऑगस्ट-
सप्टेंबर -५
ऑक्टोबर ९
नोव्हेंबर -६

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.