ETV Bharat / city

ठाण्यात अनलॉक होण्यापूर्वी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी; प्रशासन, पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे मोठा धोका - ठाणे कोरोना अपडेट

ठाण्यात अनलॉक होण्यापूर्वी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे मोठा धोका नीर्माण झाला होता.

Crowds of citizens in the market before being unlocked in Thane
ठाण्यात अनलॉक होण्यापूर्वी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी, प्रशासन पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे मोठा धोका
author img

By

Published : Jun 5, 2021, 8:33 PM IST

ठाणे - शासनाच्या नवीन नियमावलीनुसार अनलॉक करण्यात आला आहे. मात्र, अजून ही अनलॉकच्या वेळे बाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून आले. नागरीकांमध्ये ही वेळे बाबत वेगवेगळी माहिती असल्याचे दिसले. त्यामुळे आज ठाणे येथील बाजारपेठेत काही दुकाने सुरू होती, काही दुकाने बंद होती. पोलीस काही काळाने येवून सुरू असलेली दुकाने बंद करत होते. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज देवकर यांनी...

ठाण्यात अनलॉक होण्यापूर्वी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी, प्रशासन पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे मोठा धोका

ठाणे जिल्हा -

रिकव्हरी रेट - 97.18 %

डब्लिंग रेट - 446.3 दिवस

जिल्हा बेड कॅपेसिटी - 28365

बेड शिल्लक - 22834

ही अधिसूचना सोमवारपासून (7 जून) लागू होईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे त्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रशासकीय पातळीवरील या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाईल.

अनलॉकमध्ये 5 स्तर -

अनलॉक करत असताना 5 स्तर तयार करण्यात आले आहेत. पहिल्या स्तरात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरात 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसऱ्या स्तरात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या स्तरांमध्ये फक्त दोन जिल्ह्याचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एक ही जिल्हा नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या स्तरात त्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल.

काय बंद आणि काय सुरू राहणार?

या अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधित असतील, तर तर पाचव्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असतील. आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश दुसऱ्या टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यात मॉल, थिएटर आणि सर्व दुकानं सुरळीत राहतील. तर दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या शहर आणि जिल्ह्यांमध्ये मॉल आणि थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील शहर आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंधासह सेवा सुरू राहिल.

1 टप्पा स्तरात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे?

औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश असेल. या 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सर्व सेवा सुरळीत राहणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.