ETV Bharat / city

गणेशोत्सव; ठाण्यातील बाजारपेठा फुलल्या, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - ठाणे बाजारपेठ बातमी

गणेशोत्सवाच्या पूर्व संध्येला ठाण्यातील बाजारपेठ पूर्ण फुललेली दिसत आहे. मात्र, या बाजारपेठेत कोणत्याही प्रकारे काळजी न घेतां नागरिक खरेदी करत आहेत.

thane
ठाण्यातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी...
author img

By

Published : Aug 21, 2020, 8:56 PM IST

ठाणे - ठाण्यातील मुख्य बाजारपेठ जांभळी नाका ते स्टेशन रोड परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवानिमित्त खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. ठाणे शहरात रुग्णसंख्या बरे होण्याचे प्रमाण एकीकडे वाढत असताना, दुसरीकडे कोरोनाच्या संकटकाळी गर्दी केली जात आहे. तर दुसरीकडे महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून गर्दी हटवण्यासाठी सूचना केल्या जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात नागरिक कोणत्याही प्रकारे काळजी घेताना दिसत नाही.

ठाण्यातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी...

गणेशोत्सवाच्या पूर्व संध्येला ठाण्यातील बाजारपेठ पूर्ण फुललेली दिसत आहे. मात्र, या बाजारपेठेत कोणत्याही प्रकारे काळजी न घेतां नागरिक खरेदी करत आहेत. पोलीस आपल्या वाहनातून वारंवार आवाहन करूनही काही उपयोग होत नाही. आता सणाच्या निमित्ताने नागरिकांनी आपल्या सुरक्षेचाबाबतीत उपाययोजना कराव्यात, असे सजग नागरिक सांगत आहेत. ठाणे पोलिसांनी ठाण्यात सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवला असून, कोरोना प्रादूर्भाव टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन देखील केले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.