ठाणे - फेसबुक पोस्टद्वारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांच्यावर टीका करणाऱ्या केतकी चितळेला आज ( सोमवारी ) ठाणे गुन्हे शाखेने तपासासाठी तिच्या कळंबोली येथील घरी घेऊन आले. या तपासामध्ये केतकीने फेसबुक पोस्ट ( Ketki Chitale Post Controversy ) करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्याचे काम ठाणे गुन्हे शाखा ( Thane Crime Branch ) करणार आहे. यासाठी तिच्या घरांमध्ये हाऊस सर्च करून ते साहित्य जप्त करण्याचे काम गुन्हे शाखा करणार आहे.
केतकी चितळे हिने केलेली टीका आणि त्यानंतर एकूणच महाराष्ट्रात विविध ठिकाणी दाखल झालेले गुन्हे आता केतकी चितळेला सर्व बाबींचा सामना करावा लागणार आहे. ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी केतकी चितळेला आज गुन्हे शाखा तिच्या राहत्या घरी घेऊन आले. फेसबुक पोस्ट करण्यासाठी तिने वापरलेले साहित्य या गुन्ह्यात वापरलेले लॅपटॉप आणि इंटरनेट डोंगल जप्त करण्यासाठी कळंबोली येथील प्लॉट क्रमांक 88 मध्ये असलेली अवलोन इमारतीमध्ये केतकीला घेऊन गुन्हे शाखा आली आहे. तिचे जवाब देखील या ठिकाणी नोंदवण्यात येणार आहेत.
केतकीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य : केतकीला अटक केल्यापासून केतकीने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नसून तिच्या चेहर्यावर स्मितहास्य पाहायला मिळाले आहे. म्हणूनच या गुन्ह्यांने तिच्या वागण्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. ती तपासामध्ये सहकार्य देखील करत असल्याचे पोलीस सांगत आहेत.
काय आहे प्रकरण ? : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर रचलेली एक कविता तीने फेसबुकवरुन शेअर केली होती. या कवितेमुळे तिची सोशल मीडियावर अनेकांनी खिल्ली उडवली. शरद पवारांचा अपमान करणारी ही कविता असल्याचे म्हणत पवार समर्थकांनी तिच्यावर टीकाही केली. तिच्या या पोस्टनंतर राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केतकीचा निषेध करत पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर केतकीला पोलिसांकडून अटक करण्यात आली. न्यायालयाने तिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वेगवेगळ्या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळे नेहमीच चर्चेत राहत आलेली आहे.
हेही वाचा - Ketki Chitale Post Controversy : केतकी चितळेला घेऊन ठाणे गुन्हे शाखा नवी मुंबईला रवाना