ठाणे - कोरोनाच्या काळात ठाण्यात रुग्णांना बेड मिळत नव्हते. त्यावेळी कोरोनाचा कहर सुरू होता. सध्या कोरोनावर पालिकेने चांगले नियंत्रण मिळवल्याने ग्लोबल रुग्णालयाशिवाय कुठलेच कोव्हिड रुग्णालय सुरी नसल्याने रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना घरी बसविण्यात आले आहे. एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांना त्यांचे मानधनच न दिल्याची तक्रार तरुणांनी केली आहे.
मानधनाची व्यवस्था करण्याचे आश्वासन
कोरोनाचा कहर असताना पालिकेने सुरू केलेल्या कोव्हिड रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी तैनात केले होते. त्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या वतीने कंत्राटदाराच्या माध्यमातून मानधन देण्यात येत होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने अन्य रुग्णालये बंद करण्यात अली. कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने मानधनच दिले नाही. त्यामुळे कर्मचारी हे मानधनासाठी पालिकेच्या फेऱ्या मारीत आहेत. याबाबत पालिका मुख्यालय उपायुक्त संदीप माळवी यांना विचारणा केल्यानंतर सादर रुग्णालयात कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने होते. त्यांना मानधन मिळाले नाही. ते तपासून त्यांच्या मानधनाची व्यवस्था करू, असे आश्वासन दिले.
रुग्णसंख्या कमी झाल्याचा परिणाम
ठाणे शहरात कोरोना बाधा झालेल्या रुगणांची संख्या कमी झाल्याने एमएमआरडीए आणि म्हाडाने सुरू केलेले तात्पुरते कोविड रुग्णालय बंद केले आणि आता त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना पेमेंट झाले नाही. त्यामुळे त्यांच्यात मोठा रोष निर्माण झाला आहे. ही भरती तात्पुरत्या स्वरूपाची होती. त्यांना मानधन ही निश्चित करण्यात आले होते. मात्र कोणतीही पूर्व कल्पना न देता काम बंद झाल्याने कर्मचारी नाराज आहेत.