ETV Bharat / city

डेल्टा व्हेरिएंटचा धोका: ठाण्यात धबधबे, नद्या, तलाव अन् पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी - विकेंडमध्ये पिकनिक स्पॉट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डेल्टा व्हेरिएंट व्हायरसमुळे ठाणे जिल्हा हा तिसऱ्या लेव्हलमध्ये पुन्हा जैसे थे प्रमाणे आला आहे. त्यामुळे शासनाने कडक निर्बंध लादले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ठाण्यातील सर्वच धबधबे, नद्या, तलाव आणि पर्यटन स्थळे या सर्वच ठिकाणी नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

डेल्टा व्हेरिएंटचा धोका
डेल्टा व्हेरिएंटचा धोका
author img

By

Published : Jul 11, 2021, 7:55 PM IST

ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डेल्टा व्हेरिएंट व्हायरसमुळे ठाणे जिल्हा हा तिसऱ्या लेव्हलमध्ये पुन्हा जैसे थे प्रमाणे आला आहे. त्यामुळे शासनाने कडक निर्बंध लादले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ठाण्यातील सर्वच धबधबे, नद्या, तलाव आणि पर्यटन स्थळे या सर्वच ठिकाणी नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे ठाण्यालगत असणारे मुंब्रा देवी डोंगराच्या बाजूला असणारा धरण, तलाव, नदी पात्र, ओढे आणि धबधब्यावर मुंब्रा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

हजारोंच्या संख्येने गर्दी होणारे पर्यटन स्थळ पोलिसांकडून बंद

पर्यटनस्थळी गर्दी न करण्याचे पोलिसांकडून आवाहन

विकेंडमध्ये पिकनिक स्पॉट म्हणून अनेक पर्यटक या स्थळी मौजमजा करण्यासाठी येत असतात. त्यामुळे अशा भागात गर्दी होऊन कोरोनाला आव्हान देण्याचे काम पर्यटनप्रेमी करत असल्याने पोलिसांनी या ठिकाणी नागरिकांना पळवून लावले आहे. त्याचबरोबर जमाव बंदीची कारवाई देखील करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर नागरिकांनी आपला जीव धोक्यात न घालून अशा ठिकाणी न येण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले. याच धबधब्यावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज देवकर यांनी.

आजही सुरू होते युवकांचे आगमन -
आजही अनेक युवक युवती पार्टी करण्यासाठी या मुंब्रा परिसरात आले होते. मात्र मुंब्रा पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारल्यानंतर त्यांना परतावे लागले आहे. पोलिसांनी या ठिकाणी गस्त तर ठेवली आहे. सोबत कलम 279 नुसार कारवाई आणि जमावबंदी कायद्याने गुन्हा दाखल करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने आता या ठिकाणी युवत थांबत नाहीत.

धोकादायक बोर्ड पडला
या ठिकाणी धोकादायक असलेला बोर्ड पडलेला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी महानगर पालिकेकडे या ठिकाणी पुन्हा बोर्ड लावण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. लवकरच हा परिसर धोकादायक असल्याचा बोर्ड ही लागणार आहे.

हेही वाचा - मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय - राज ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.