ठाणे - ठाण्यात महागाई विरोधात आज काँग्रेसने मोर्चाचे आयोजन केले होते. दिलेल्या वेळेनंतर उशिराने सुरू झालेला हा मोर्चा काही काळात जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत बिना मास्क काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन या मोर्चाची सांगाता झाली.
ठाण्यात आयोजित केलेल्या काँग्रेसच्या महिला मोर्चामध्ये प्रणिती शिंदे आणि महिला प्रदेशाध्यक्ष संध्याकाळी सव्वालाखे यांच्यासह अनेक महिला काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारचा सोशल डिस्टन्स न पाळता मास शिवाय मोठी गर्दी करत हा मोर्चा महिलांना महागाईमुळे होत असलेल्या अडचणीविरोधात होता. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये पोहोचल्यावर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चा समाप्त केला.
सरकार दडपशाही करतय
एकीकडे राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी सरकारला घरचा आहेर दिला. त्यांनी हे सरकार शिवजयंतीच्या बाबतीत दडपशाही करत असल्याचं सांगत आम्ही यावर बोलू शकत नाही असंही त्यांनी सांगितले आहे. शिवजयंतीबाबत सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे सर्वच पक्षात रोष निर्माण झाला आहे. मात्र, यावर बोलणे सर्वच टाळत आहेत.