ETV Bharat / city

Eknath Shinde Replied Rashmi Thackeray: रश्मी ठाकरेंना दिले एकनाथ शिंदेंनी दिले उत्तर; ठाण्यात चार पिढ्यांसह केली टेंभी नाक्यावर पूजा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde Replied Rashmi Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी दरवर्षी प्रमाणे नवरात्र उत्सवाच्या आजच्या पंचमीला सहकुटुंब टेंभी नाका देवीची पूजा अर्चा करून महाआरती केली. मात्र यंदाच्या पूजेच विशेष महत्त्व होतं, ते पहिलं म्हणजे एकनाथ शिंदे यांची चौथी पिढी या आरतीला उपस्थित होती, तर दुसर म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा एकनाथ शिंदेंकडून सहकुटुंब ही महाआरती केली गेली आहे.

Chief Minister replied Rashmi Thackeray
Chief Minister replied Rashmi Thackeray
author img

By

Published : Sep 30, 2022, 7:28 PM IST

ठाणे: Eknath Shinde Replied Rashmi Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी दरवर्षी प्रमाणे नवरात्र उत्सवाच्या आजच्या पंचमीला सहकुटुंब टेंभी नाका देवीची पूजा अर्चा करून महाआरती केली. मात्र यंदाच्या पूजेच विशेष महत्त्व होतं, ते पहिलं म्हणजे एकनाथ शिंदे यांची चौथी पिढी या आरतीला उपस्थित होती, तर दुसर म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा एकनाथ शिंदेंकडून सहकुटुंब ही महाआरती केली गेली आहे. CM Eknath Shinde went tembhi naka in thane मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्र शिंदे हे उपस्थित होते.

यावेळी सगळे भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेत आहेत. ठाण्यात ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा देवीचा उत्सव आहे. या देवीच महत्व महाराष्ट्रात नाही, तर देशभरात देखील पसरलेल आहे. टेंभी नाका देवीचा मुखवटा सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हजारो लाखो भाविक या ठिकाणी देवीला भेटायला येत असतात. या टेंभी नाकाच्या देवीच्या उत्सवाला वेगळा महत्व आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही या ठिकाणी देवीची पूजा केलेली आहे. या ठिकाणी आम्ही सर्व नागरिक तसेच कार्यकर्त्यांसोबत एकत्रितरित्या आरती केलेली आहे.

रश्मी ठाकरेंना दिले मुख्यमंत्र्यांनी उत्तर

देवीकडे हे मागितले देवीची सेवा करत करत मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचलेलो आहे. हा सर्व देवीचा आशीर्वाद आहे. या देवीचा आशीर्वाद राज्यातील सर्व जनतेवर राहावा, राज्यावरील सर्व दुःख, रोगराई दूर व्हावी, या राज्यातील सर्व लोकांच जीवन बदलत त्यांच्या आयुष्यात आमुलाग्र बदलू दे, त्यांच्या जीवनात ऐश्वर्य समाधान व आरोग्य लाभू दे, व राज्य सुजलाम सुफलाम व्हावं, या राज्यातील सर्व घटक बळीराजा शेतकरी वारकरी कामगार कष्टकरी सगळे समाज घटकांना सुख समृद्धी लाभू दे हेच मागणं देवीच्या चरणी मागितल्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच बाळासाहेबांची भूमिका बाळासाहेबांचे विचार कोणी खंडित केले, बाळासाहेबांच्या विचारांसोबत प्रतारणा कोणी केली. सत्तेसाठी तडजोड कोणी केली, हे मला सांगण्याची आवश्यकता आहे का ? बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत आणि म्हणूनच या राज्यातील प्रत्येक घटक या राज्याचे लाखो लोक या गोष्टीला समर्थन देत असल्याचे सांगितले आहे.

रश्मी ठाकरेंना टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. Chief Minister replied Rashmi Thackeray तर रश्मी ठाकरे यांनी टेंभी नाका देवीच्या दर्शना दरम्यान केलेल्या शक्ती प्रदर्शनाबद्दल एकनाथ शिंदे यांना विचारला असता, ही शक्ती प्रदर्शन करण्याची जागा नाही, ही मनोभावी देवीची पूजा करण्याची जागा आहे. त्यामुळे या टेंभी नाकाच्या देवीच्या उत्सवाची सुरुवात धर्मवीर आनंद दिघे यांनी केली. ती अखंडितपणे पुढे नेण्याचं काम त्यांचा एक शिवसैनिक म्हणून मी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

12 पैकी 11 महंत संजय राठोड यांच्या सोबत तसेच यादरम्यान बंजारा समाजाचे महंत आणि संजय राठोड यांचे गुरु यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावर एकनाथ शिंदे यांनी बारा महंतांपैकी, अकरा म्हणतांनी संजय राठोड यांना आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, असे देखील म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.