ETV Bharat / city

भाईंदर पश्चिममध्ये नागरिकांचा चक्क कोरोना चाचणीला विरोध

author img

By

Published : Jul 15, 2020, 9:13 PM IST

आरोग्य विभागाचे कर्मचारी जय बजरंग नगरमध्ये गेले. यावेळी स्थानिक नागरिकांनी आम्हाला चाचणी करायची नाही,असे कर्मचाऱ्यांना सांगितले.

नागरिकांची समजूत घालताना मनपाचे कर्मचारी

ठाणे - मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी 'चेस द व्हायरस' या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. या मोहिमेत घरोघरी जाऊन नागरिकांची कोविड तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेला भाईंदर पश्चिमेच्या जय बजरंग नगरमध्ये नागरिकांनी चक्क विरोध केला.

आरोग्य विभागाचे कर्मचारी जय बजरंग नगरमध्ये गेले. यावेळी स्थानिक नागरिकांनी आम्हाला चाचणी करायची नाही,असे कर्मचाऱ्यांना सांगितले.

येथे तपासणी करू नका, असेही नागरिकांकडून सांगण्यात आले. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग होता. त्यांनीही प्रशासनालाही विरोध केला.

याठिकाणी स्थानिक नगरसेवक दरोगा पांडे यांनीदेखील नागरिकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. प्रशासनाने माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.