ठाणे माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांची समाज माध्यमांवर बदनामी करणाऱ्या अनंत करमुसे यांच्या विरोधात अखेर न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात ( Anant Karamuse defamed NCP leader Jitendra Awad ) आले. या दोषारोपात पाच वेळा समन्स पाठवूनही करमुसे तपासकामी हजर झाले नसल्याचा ठपका पोलिसांच्या वतीने ठेवण्यात आला ( charge sheet in court against Anant Karamuse )आहे. विशेष म्हणजे करमुसे यांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात त्यांच्याविरोधातच न्यायालयाने ताशेरे ओढले असून करमुसे यांचा न्यायालयात येण्याचा हेतू स्वच्छ नसल्याचे मत नोंदवले आहे. जितेंद्र आव्हाड यांचे समाज माध्यमांवर अर्धनग्न स्वरूपातील टाकण्यात आलेले छायाचित्र हेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का ? असा प्रश्न देखील न्यायालयाने उपस्थित केला आहे.
अनंत करमुसे यांनी डाॅ. जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न अवस्थेतील माॅर्फ केलेले छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारीत केले होते. या विरोधात आव्हाड यांचे निकटवर्तीय हेमंत वाणी यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी 6 एप्रिल 2020 रोजी भादंवि 292, 500 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 66 (ई) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
करमुसे यांच्याकडून जप्त केलेल्या फोनमध्ये डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र सापडले पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपात करमुसे यांच्याकडून जप्त केलेल्या फोनमध्ये डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र सापडले होते. करमुसे याने स्वतःच्या मोबाईल फोनमधुन स्वतः चे फेसबुक अकाउंटवरून डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचा एडीट केलेला अर्धनग्न अवस्थेतील अश्लिल फोटो अपलोड करून प्रसिद्ध केला असल्याने सदरचा मोबाईल फोन जप्त करून फोरेन्सिक लॅबमध्ये पाठविला असता, जातीद्वेष-धर्मद्वेष, व्यक्तीद्वेष आदी 27 प्रकारचे द्वेष पसरविणार्या पोस्ट करमुसे याने आपल्या वैयक्तिक अकाउंटवरून फेसबुक व ट्विटरवर अपलोड केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले ( defamed NCP leader Jitendra Awad on social media ) आहे.
पाच वर्षांपासून माझ्यासकट कुटुंबियांना ही त्रास पाच वर्षे अनंत करमुसे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करीत होते. या कामी अन्य कोण साह्य करीत आहे का? याचा शोध घेण्यासाठी अनंत करमुसे यांना सुमारे 5 वेळा समन्स पाठवूनही केवळ एकच वेळ तपासकामी ते हजर झाले असल्याचे दोषारोपात नमूद केले आहे. तर, करमुसे याच्या ट्वीटमध्ये जातीद्वेष, धर्मद्वेष दिसत असून शरद पवार यांचा शरदद्दीन आणि जितेंद्र आव्हाड यांचा जितुद्दीन असा उल्लेख असलेले छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारीत केले होते. हे सर्व पुरावे पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहेत.
अडीच वर्षाने तपास पुर्ण जितेंद्र आव्हाड यांचा अर्धनग्न स्वरूपातील छायाचित्र आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या संदर्भात समाज माध्यमांवर वादग्रस्त पोस्ट टाकण्यात आली ( Anant Karamuse defamed NCP leader Jitendra Awad ) होती. याविरोधात वर्तकनगर पोलीस पोलीस ठाण्यात हेमंत वाणी यांनी ६ एप्रिल २०२० रोजी दिलेल्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास करून मंगळवारी न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात करमुसे यांना पाच वेळा समन्स पाठवूनही ते एकदाच हजर झाले आहेत .अडीच वर्षानंतर आता चार्ज शीट तपास पूर्ण झाल्यामुळे फाईल केली असल्याचे त्यांनी आज सांगितले आहे.
हे कसले अभिव्यक्ती स्वतंत्र ? या प्रकरणात पोलीस तपासातच सर्व उघड झाले आहे. पाच वर्ष मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरु होता. विचारांची लढाई ही विचारांनीच लढायला हवी. करमुसे याचा न्यायालयात येण्याचा हेतूही स्वच्छ नव्हता, असे मत न्यायालयानेच नोंदवले आहे. माझे अशा प्रकारे अर्धनग्न छयाचित्र एडिट करून समाज माध्यमांवर टाकणे, हे कोणते अभिव्यक्ती स्वतंत्र आहे ?