ETV Bharat / city

Thane Crime ऑनलाईन महागड्या वस्तू मागवून लाखोंचा लावला चुना, इंजिअर डे दिवशीच पडल्या बेड्या - Chained gang along with engineer accused

Thane Crime बनावट आधार कार्डाच्या सहाय्याने सीम कार्ड मिळवायचे. त्या सीमकार्डच्या सहाय्याने ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांमधून महागड्य़ा ऑनलाईन वस्तू मागवायचे. Thane Crime त्यानंतर मागविलेल्या वस्तू आल्या की, पार्सल बॉयला बतावणी करुन त्याने आणलेल्या पार्सलमध्ये दुसरी वस्तू टाकून परत करून कंपन्यांना लाखोंचा चुना लावणाऱ्या 5 जणांच्या टोळीला मानपाडा पोलिसांना Manpada Police अटक करण्यात यश आले आहे.

Thane Crime
Thane Crime
author img

By

Published : Sep 15, 2022, 10:59 PM IST

ठाणे बनावट आधार कार्डाच्या सहाय्याने सीम कार्ड मिळवायचे. त्या सीमकार्डच्या सहाय्याने ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांमधून महागड्य़ा ऑनलाईन वस्तू मागवायचे. Thane Crime त्यानंतर मागविलेल्या वस्तू आल्या की, पार्सल बॉयला बतावणी करुन त्याने आणलेल्या पार्सलमध्ये दुसरी वस्तू टाकून परत करून कंपन्यांना लाखोंचा चुना लावणाऱ्या 5 जणांच्या टोळीला मानपाडा पोलिसांना Manpada Police अटक करण्यात यश आले आहे. Thane Police खळबळजनक बाब म्हणजे या टोळीचा म्होरक्या इंजिनिअर आहे. रॉबिन आरुजा (वय २८) असे इंजिनिअर नाव असून त्याच्यासह किरण बनसोडे (वय २६) रॉकी दिनेशकुमार कर्न (वय २२), नवीन सिंग वय (२२), आलोक यादव (वय २०), असे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आरोपीची नावे आहेत.

महागड्य़ा वस्तूची कमी किमतीत विक्री डोंबिवली पूर्वेतील पलावा सिटी या हायप्रोफाइल सोसायटीमध्ये राहणारा आरोपी रॉबिन आरूजा हा पेशाने इंजिनिअर आहे. झटपट पैसे कमविण्याच्या नादात त्याने आणखी चार जणांची निवड केली होती. त्याच्या टोळीत सिम कार्ड विक्रेता देखील होता. ही पाच जणांची टोळी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपनीला गंडा घालण्याचे काम बऱ्याच महिन्यापासून करत होते. या महागड्य़ा वस्तू त्या बाजारात कमी किमतीत विक्री करायचे, आणि त्यामधून मिळालेल्या पैश्यातून मौजमजा करत होते. अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे.

तो बॉक्स पुन्हा कंपनीला पाठवून द्यायचे या टोळीकडून बनावट आधारकार्ड तयार करून त्या आधारे सिम कार्ड मिळवले जात होते. या सिम कार्डच्या आधारे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपनीकडून मोबाईल व इतर महागड्या वस्तू ऑर्डर केली जात असत. या वस्तू घेऊन डिलिव्हरी बॉय आल्यानंतर त्याच्याकडून काही ना काही बहाणा करून तो बॉक्स घ्यायचे, त्याची नजर चुकवून अवघ्या काही क्षणात बॉक्स कटरच्या साह्याने कापून त्यातील वस्तू काढून त्याऐवजी त्याच वजनाच्या दुसऱ्या वस्तू ठेवायचे, पैसे कमी असल्याचा बहाणा करत तो बॉक्स पुन्हा कंपनीला पाठवून द्यायचे.

पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त ॲमेझॉनसह फ्लिपकार्ट कंपनीच्या कर्मचाऱ्याने मानपाडा पोलीस ठाण्यात Manpada Police Station तक्रार दिली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठ्या शिताफिने या प्रकरणाचा तपास करत या टोळीला बेड्या ठोकल्या आहे. त्यांच्याकडून 22 मोबाईल, एक लॅपटॉप, एक आयपॅड, एक टॅब, वीस सिम कार्ड, 29 बनावट आधारकार्ड असा पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

देशभरात गुन्हे केल्याचे उघडकीस या पाच जणांनी गुजरात, कलकत्ता राज्यातील विविध शहरात तसेच पुणे मुंबई, सातारा, ठाणे, अलिबाग या शहरात अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे. यापूर्वी देखील त्यांना कराड, अलिबाग, कासारवडवली या पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे गुन्हे केल्याबद्दल अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.