ETV Bharat / city

थरारक! भरधाव ट्रकने तीन पादचाऱ्यांना जखमी करून रस्त्यावरील वाहनांना चिरडले - ठाण्यात भरधाव ट्रकने वाहनांना उडवले

एका ट्रक चालकाने भरधाव ट्रक चालून रस्त्यावरून जाणाऱ्या तीन पादचाऱ्यांना जखमी केले.

thane
सीसीटीव्ही भरधाव ट्रक अपघात
author img

By

Published : Nov 4, 2020, 8:32 PM IST

Updated : Nov 4, 2020, 10:05 PM IST

ठाणे - एका ट्रक चालकाने भरधाव ट्रक चालून रस्त्यावरून जाणाऱ्या तीन पादचाऱ्यांना जखमी केले. तर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ४ ते ५ दुचाक्यांना चिरडून त्यांचे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगरच्या १७ सेक्शन परिसरात घडली असून, या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सीसीटीव्ही दृष्य

हेही वाचा - आता आल्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका.. जाणून घ्या संपूर्ण प्रकिया

या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. बबन धूंडीराम जाधव असे ताब्यात घेललेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तर सागा चंद्रकांत पवार, बन्नी मुदियार, आणि एक व्यक्ती असे भरधाव ट्रकच्या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

सुधारक सुरडकर - वरिष्ठ पोलीस निरीक्षक

असा घडला अपघाताचा थरार

आरोपी ट्रक चालक हा उल्हासनगर महापालिकेच्या मार्गावरून १७ सेक्शनकडे आज दुपारच्या सुमाराला येत होता. त्यावेळी भरधाव ट्रक रहदारी असलेल्या १७ सेक्शन परिसरात येतच, रस्त्याच्याकडेला पायी जाणाऱ्या तिघांना धडक दिली. या धडकेत तिघेही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत ट्रक चालकाला ताब्यात घेऊन अधिक तपास पोलिसांनी सुरू केला.

Last Updated : Nov 4, 2020, 10:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.