ETV Bharat / city

ठाणे : उपमहापौरांच्या पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल, बंद काळात केली होती रिक्षाचालकांना मारहाण - रिक्षाचालकांना मारहाण

लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी (दि. 11) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. राज्यभर महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे नेते व कार्यकर्ते बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. या दरम्यान रिक्षाचालकांना दमदाटी व मारहाण केल्या प्रकरणी उपमहापौरांच्या पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मारहाणीचे छायाचित्र
मारहाणीचे छायाचित्र
author img

By

Published : Oct 12, 2021, 1:26 PM IST

ठाणे - लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी (दि. 11) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. राज्यभर महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे नेते व कार्यकर्ते बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. या दरम्यान रिक्षाचालकांना दमदाटी व मारहाण केल्या प्रकरणी उपमहापौरांच्या पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मारहाणीचा व्हिडिओ

सोमवारी राज्यात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. राज्यात विविध ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्षाचे नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून बंदचे आवाहन करत होते. त्यावेळी ठाणे महापालिकेच्या उपमहापौर पल्लवी कदम यांचे पती पवन कदम हे रिक्षाचालकांना दमदाटी करत होते. त्यांच्याच उपस्थितीत माजी नगरसेवक गिरीश राजे हे रिक्षाचालकांच्या कानशिलात लगावत होते. तसेच काही शिवसैनिक रिक्षाचालकांना दमदाटी करून प्रवासी उतरवून घरी जा म्हणत होते. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरलही झाला होता. मनाईचे आदेश असतानाही प्रतिबंधक आदेशाचा भंग करून रिक्षाचालकांना धमकावून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

'यांच्या'वर झाला गुन्हा दाखल

महाराष्ट्र बंदच्या काळात रिक्षाचालकांना दमदाटी करत मारहाण केल्या प्रकरणी उपमहापौरांचे पती माजी नगरसेवक पवन कदम, माजी नगरसेवक गिरीश राजे, शिवसेना पदाधिकारी किरण नाक्ती, प्रकाश पायरे, महेंद्र मढवी यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा - ठाणे : चोरीच्या संशयावरून जमावाकडून रॉडसह दांडक्याने मारहाण, हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.