ETV Bharat / city

Valentine Day With animals : ठाण्यातील तरुणाईने साजरा केला प्राण्यांसोबत अनोखा व्हॅलेंटाईन डे

ठाण्यातील वाघबीळ परिसरात कॅप फाउंडेशन ही सामाजिक संस्था जखमी अवस्थेत आढळणाऱ्या आणि आजरी पडल्याने रस्त्यावर सोडलेल्या मुक्या प्राण्यांसाठी काम करते. त्यासाठी या संस्थेने फ्रीडम फार्म नावाचे निवारा केंद्र देखील उभारले आहे.

Valentine Day With animals
Valentine Day With animals
author img

By

Published : Feb 15, 2022, 8:03 PM IST

ठाणे : व्हॅलेंटाईन डे म्हटल की अनेक तरुण तरुणी बाहेर फिरायला जातात. एकमेकांना गिफ्ट देतात. मात्र या प्रथेला फाटा देत ठाण्यात काही तरुणांनी मुक्या प्राण्यांसोबत साजरा केला आहे. ठाण्यातील तरुणाईने यंदाचा व्हॅलेंटाईन डे अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. त्यांनी यंदाचा व्हॅलेंटाईन डे प्राण्यांसोबत साजरा केला.

प्राण्यांसोबत अनोखा व्हॅलेंटाईन डे
ठाण्यातील वाघबीळ परिसरात कॅप फाउंडेशन ही सामाजिक संस्था जखमी अवस्थेत आढळणाऱ्या आणि आजरी पडल्याने रस्त्यावर सोडलेल्या मुक्या प्राण्यांसाठी काम करते. त्यासाठी या संस्थेने फ्रीडम फार्म नावाचे निवारा केंद्र देखील उभारले आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त येथील प्राण्यांची भेट घेता यावी व त्याच्यासोबत वेळ घालवता यावा यासाठी कॅपने 'मिट युवर मॅच' चे आयोजन केले होते. या उपक्रमात कुत्रा मांजर ,गाय ,गाढव ,बैल, गिंन्नी या प्राणांचा समावेश करण्यात आला होता. प्राण्यांना भेटण्यासाठी ठराविक वेळ देखील ठरवण्यात आला होता. प्राण्याबद्दल क्रूरता कमी होऊन त्यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी लोकांच्या मनात यावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन संस्थेने केले होते. मुक्या प्राण्यांच्या प्रती आपले प्रेम व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध करून दिली तसेच आपल्या आवडत्या प्राण्याला दत्तक घ्यायचे असल्यास ती व्यवस्था देखील केल्याचे संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितले.
या कार्यक्रमातून मिळाले समाधान
प्रेमाचा सन्मान आणि प्रेम वक्त करण्याच्या या दिवशी मुक्या प्राण्यांना आपल्या आनंदात सहभागी करून त्यांची केलेली सेवा हे खूप मोठे मानसिक समाधान देणारे असल्याचे या युवकांनी सांगितले आहे .आता दरवर्षी अशाच प्रकारे वेलेन्टाइन डे साजरा करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगतले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.