ETV Bharat / city

उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला तर, दुसऱ्या घटनेत संरक्षण भिंत कोसळली

पहिल्या घटनेत दुरुस्ती करतानाच चौथ्या मजल्याचा स्लॅब अचानक तिसऱ्या मजल्यावर दुपारच्या सुमाराला कोसळला. दुसर्‍या घटनेत पाच-सहा दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने ही भिंत वाल दरीच्या पात्रात कोसळली.

उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला
author img

By

Published : Jul 7, 2019, 7:56 PM IST

ठाणे - संततधार पाऊस सुरू असल्याने एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्लॅब तिसऱ्या मजल्यावर कोसळला आहे. तर, दुसऱ्या घटनेत इमारतीची संरक्षण भिंत वालधुनी नदीत कोसळल्याची घटना उल्हासनगर येथे घडली आहे. दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पहिल्या घटनेत उल्हासनगर कॅम्प नंबर-२ येथील झुलेलाल मंदिरच्या बाजूला 'हम लोग' ही ४ मजल्याची धोकादायक इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने तिसरा मजला खाली करण्यात आला होता. दुरुस्ती करतानाच चौथ्या मजल्याचा स्लॅब अचानक तिसऱ्या मजल्यावर दुपारच्या सुमाराला कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.

उल्हासनगर दुर्घटना

दुसर्‍या घटनेत कल्याण अंबरनाथ रोडवरील उल्हासनगरच्या शांती नगरीतील प्रवेश दाराजवळ रिजन्सी निर्माण हे भव्य गृहसंकुल उभारण्यात आले आहे. या संकुलाची संरक्षण भिंत अगदी वालधुनी नदीच्या काठाजवळ बांधलेली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने ही भिंत वाल दरीच्या पात्रात कोसळली. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:उल्हासनगरात एका इमारतीचा स्लॅब कोसळला तर दुसर्‍या घटनेत इमारतीची संरक्षण भिंत कोसळली

ठाणे :- संततधार पाऊस सुरू असल्याने एका इमारतीचा चौथ्या मजल्याला स्लॅब तिसऱ्या मजल्यावर कोसळला तर दुसऱ्या इमारतीची संरक्षण भिंत वालधुनी नदीत कोसळल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे ,
पहिल्या घटनेत उल्हासनगर कॅम्प नंबर 2 येथील झुलेलाल मंदिर च्या बाजूला हम लोग ही चार मजल्याची धोकादायक इमारत आहे या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने तिसरा मजला खाली करण्यात आला होता दुरुस्ती करतानाच चौथ्या मजल्याचा स्लॅब अचानक तिसऱ्या मजल्यावर दुपारच्या सुमाराला कोसळला सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही, तर दुसर्‍या घटनेत कल्याण अंबरनाथ रोड वरील उल्हासनगरच्या शांती नगरीतील प्रवेशदाराजवळ रीजन्सी निर्माण ही भव्य गृह संकुल उभारण्यात आले आहे या संकुलाचे भिंत अगदी वालधुनी नदीच्या काठाजवळ संरक्षण भिंत बांधलेली आहे गेल्या पाच-सहा दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने ही भिंत वाल दरीच्या पात्रात कोसळली सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली,
tha, ulhasnagar sleb 7.7.19

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.