ETV Bharat / city

Thane District Election : अरेच्चा, शिवसेनेच्या प्रचार फेरीत बच्चे कंपनीकडून भाजपाचा जयजयकार, पाहा व्हिडिओ

एकमेकांचे राजकीय वैर असलेल्या शिवसेनेच्या प्रचार फेरीतील ( Bjp Slogan by Children in Shiv Sena Campaign ) बच्चे कंपनीने समोरून येणाऱ्या भाजपाच्या प्रचार फेरीतील घोषणाबाजीला प्रतिसाद देत, भाजपाची जयजयकार केल्याचे एक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्र्यांसह नेत्यांना मनातल्या मनात गुदगुल्या झाल्यासारखे झाले आणि हा संपूर्ण प्रकार पाहून त्यांनाही हसू आवरले नाही.

author img

By

Published : Dec 20, 2021, 7:38 AM IST

Bjp Slogan by Children in Shiv Sena Shahapur-Murbad Elections rally
अरेच्चा, शिवसेनेच्या प्रचार फेरीत बच्चे कंपनीकडून भाजपाचा जयजयकार, पाहा व्हिडिओ

ठाणे - जिल्ह्यात शहापूर व मुरबाड नगरपंचायत निवडणुकीच्या ( Shahapur-Murbad Elections ) प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यातच एका घटनेमुळे प्रचार चांगलाच गाजला आहे. एकमेकांचे राजकीय वैर असलेल्या शिवसेनेच्या प्रचार फेरीतील बच्चे कंपनीने समोरून येणाऱ्या भाजपाच्या प्रचार फेरीतील घोषणाबाजीला प्रतिसाद देत, भाजपाचा जयजयकार केल्याचे एक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्र्यांसह नेत्यांना मनातल्या मनात गुदगुल्या झाल्यासारखे झाले आणि हा संपूर्ण प्रकार पाहून त्यांनाही हसू आवरले नाही.

शिवसेनेच्या प्रचार फेरीत बच्चे कंपनीकडून भाजपाचा जयजयकार
प्रचार फेरी आली आमनेसामने -

मुरबाड नगरपंचायतच्या 17 प्रभागासाठी निवडणूक होत आहे. यामध्ये चार प्रभागात ओबीसीचे आरक्षण असल्याने ते चारही प्रभाग वगळून इतर प्रभागात निवडणुकीच्या प्रचार धुमधडाक्यात सुरु आहे. त्यातच प्रभाग क्र. 10 मधील शिवसेनेच्या उमेदवार मोनिका शेळके विरुद्ध भाजपाच्या वैशाली घरत यांच्यात सरळ लढत आहे. तर एकमेव अपक्ष उमेदवार मंदा चिराटे याही नशीब अजमावत आहेत. आज सुट्टीच्या दिवशी प्रभागात केंदीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची प्रचार फेरी सुरु होती. त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराची प्रचार फेरी आमनेसामने आली.

शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उडाला गोंधळ -

भाजपच्या प्रचार फेरीत लाऊडस्पीकर लावून घोषणाबाजी करण्यात येत होती. भाजपा व केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची 'आगे बडो हम तुम्हारे साथ है, अशी घोषणा सुरु असतानाच शिवसेनेच्या प्रचार फेरीत हातात शिवसेनेचे झंडे असलेल्या बच्चे कंपनीने भाजपाच्या प्रचार फेरीतील घोषणाबाजीला प्रतिसाद देत, भाजपाची जयजयकार केल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. तर बच्चे कंपनीच्या भाजपा जयजयकार घोषणामुळे भाजपाच्या गोटात आनंद पसरला होता. आता व्हिडिओ समाजमाध्यमावर भलताच व्हायरल झाल्याने तालुक्यात वेगळं राजकीय वातारण निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले आहे.

हेही वाचा - omicron patients - पुणे जिल्ह्यातील पाच वर्षीय मुलाला ओमायक्रॉनची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.