ETV Bharat / city

ठाण्यातील अनेक सीसीटीव्ही बंद; महिला सुरक्षासंदर्भात भाजप महिला मोर्चाची पालिकेसमोर निदर्शने - thane womens security

ठाण्यातील अनेक सीसीटीव्ही बंद आहेत. त्यामुळे महिलांची सुरक्षा रामभरोसे आहे, असे म्हणत भाजप महिला मोर्चान ठाणे पालिकेसमोर निदर्शने केली.

BJP Mahila Morcha
भाजप महिला मोर्चाची ठाणे पालिकेसमोर निदर्शने
author img

By

Published : Jul 1, 2021, 8:52 PM IST

Updated : Jul 1, 2021, 9:09 PM IST

ठाणे - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत तब्बल दहा कोटी रुपये खर्च करून शहरातील मोक्याच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या १४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यापैंकी केवळ चारशेच कॅमेरे सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचाच जाब विचारण्यासाठी आज ठाणे भाजप महिला मोर्चाने थेट महापालिकेतच धडक देत प्रशासनाला जाब विचारला.

भाजप महिला मोर्चाची ठाणे पालिकेसमोर निदर्शने

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात लावलेले कॅमेरे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. ते केव्हाच बंद पडल्याने शहरातील गुन्हेगार बेफिकीर झाल्याचा आरोप भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी केला. गुन्हा घडल्यावर गुन्हेगारांच्या तपासात सर्वात महत्वाची भूमिका बजावणारे सीसीटीव्हीच जर बंद असतील तर महिलांची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचा आरोप त्यांनी केला. सदरचे बंद पडलेले कॅमेरे लवकरात लवकर दुरुस्त करावेत, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तसे झाले नाही तर भाजप कार्यकर्त्यांतर्फे ठाणे महानगरपालिकेला घेराव घालून आंदोलन करण्याचा इशाराही पेंडसे यांनी दिला.

अनेक मोठ्या गुन्ह्यात सीसीटीव्ही मिळाले नाही -

ठाणे शहरामध्ये असलेल्या सीसीटीव्हींची गरज मुंबई पोलीस दल, हायवे अॅथोरिटी आणि इतर सरकारी तपास यंत्रणांना लागते. मात्र, अनेक सीसीटीव्ही बंद असल्याने फुटेज मिळू शकत नाही. तसेच अगदी सचिन वाझे तपासातही अनेक फुटेज उपलब्ध झालेले नाहीत.

Last Updated : Jul 1, 2021, 9:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.