ETV Bharat / city

भिवंडी इमारत दुर्घटना : मालक, भोगवटादार व पालिकेचे अधिकारी दोषी, चौकशी अहवालात स्पष्ट

21 सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास ही इमारत कोसळून 38 जणांचा जीव गेला होता. तसेच 25 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेला जबाबदार धरत पालिका आयुक्त पंकज आशिया यांनी प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे तडकाफडकी निलंबन केले होते. याच दुर्घटनेविषयी आता धक्कादायक अहवाल चौकशी समितीने दिला आहे.

jilani building collapse in bhiwandi
भिवंडी इमारत दुर्घटना : मालक, भोगवटादर व पालिकेचे अधिकारी दोषी, सर्वांचा हलगर्जीपणा जबाबदार
author img

By

Published : Oct 10, 2020, 11:33 AM IST

Updated : Oct 10, 2020, 12:30 PM IST

ठाणे - भिवंडीतील पटेल कंपाऊंड येथील जिलानी इमारत दुर्घटनेत मालक, भोगवटादार व महापालिकेचे संबंधित अधिकारी दोषी असल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी हा अहवाल पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांना सादर करण्यात आला. ही इमारत बेकायदा बांधण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. संबंधित इमारत सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी मालक, भोगवटाधारकांवर होती. मात्र त्यांनी घेतली नाही. तसेच पालिका अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाल्याचे अहवालात नमूद आहे.

भिवंडी इमारत दुर्घटना : मालक, भोगवटादार व पालिकेचे अधिकारी दोषी, चौकशी अहवालात स्पष्ट

सरकारच्या निर्देशानुसार मार्च-एप्रिलमध्ये धोकादायक, अतिधोकादायक इमारतींना नोटीस देऊन त्यांची वर्गवारी 'सी-1' व 'सी-2' असे करणे आवश्यक होते. मात्र तशी शहानिशा पालिका अधिकार्‍यांनी केली नव्हती. तसेच या इमारतीचे वर्गीकरण देखील तत्कालीन अधिकाऱ्यांनी केले नव्हते. जिलानी इमारत धोकादायक ठरवल्यानंतर ही इमारत निर्मनुष्य करण्यासाठी पोलीस प्रशासनाला कोणतेही पत्र देण्यात आले नाही. त्यामुळे चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात इमारत मालकांबरोबरच भोगवटादार आणि महापालिकेचे संबंधित अधिकारीही दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात अशी दुर्घटना घडू नये, यासाठी धोका नियमावली ही चौकशी समितीने प्रशासनाला सादर केली आहे.

नक्की काय झाले 21 सप्टेंबरच्या पहाटे?

21 सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास ही इमारत कोसळून 38 जणांचा जीव गेला होता. तसेच 25 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेला जबाबदार धरत पालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे तडकाफडकी निलंबन करून या दुर्घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.

बांधकाम परवानगी नव्हती

या चौकशी समितीत उपायुक्त डॉक्टर दीपक सावंत, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, सहाय्यक संचालक नगररचना प्रल्हाद होगे- पाटील यांचा समावेश होता. ही इमारत 1957 मध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात असताना बांधण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या इमारतीस बांधकाम परवानगी दिल्याचे दिसून येत नाही, असेही समितीने अहवालात नमूद केले आहे.

Last Updated : Oct 10, 2020, 12:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.