ETV Bharat / city

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत दिशा मंचच्या माध्यमातून टोल नाक्यावर जनजागृती - Disha Manch Awareness Kalamboli Toll Naka

जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधत दिशा मंचच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती अभियान कळंबोली टोल नाका येथे आयोजित केले होते. यावेळी मंचाकडून टोल नाक्यावर वाहने थांबविणाऱ्या वाहनधारकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवून देण्यात आले.

Disha Manch Awareness Kalamboli Toll Naka
पर्यावरण जनजागृती दिशा मंच
author img

By

Published : Jun 5, 2021, 5:16 PM IST

नवी मुंबई - जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधत दिशा मंचच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती अभियान कळंबोली टोल नाका येथे आयोजित केले होते. यावेळी मंचाकडून टोल नाक्यावर वाहने थांबविणाऱ्या वाहनधारकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवून देण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करतानाचे दृश्य

हेही वाचा - पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्याची थेट नदीत उडी; तरुणांनी पोलिसांच्या केले स्वाधीन

पर्यावरण संवर्धन व्हावे म्हणून जनजागृती

सद्यस्थितीत पर्यावरणाचे संवर्धन करणे ही खूप महत्वाची बाब बनली आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यास सगळेच निसर्गाला दोष देतात, मात्र आपण जी पर्यावरणाची हानी केली ते आपण पाहत नाही. त्याचीच शिक्षा म्हणून की काय आज मानवजातीला कोरोनाचा त्रास होत आहे व मोफत मिळणाऱ्या ऑक्सिजनची आता भरमसाठ किंमत मोजावी लागत आहे. पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी, मोफत ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची लागवड व्हावी व संवर्धनही व्हावे, जनजागृती व्हावी याकरिता कळंबोली टोल नाक्यावर दिशा मंचच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

कामोठे कळंबोली परिसरात लावण्यात आली झाडे

दिशा मंचच्या माध्यमातून कळंबोली पोलीस स्टेशन व कामोठे आरोग्य विभाग येथे झाडे लावण्यात आली. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. दिशा व्यासपीठाच्या संस्थापक निलम आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष विद्या मोहिते, सेक्रेटरी खुशी सावर्डेकर, कमिटी सदस्य रेखा ठाकूर, निवेदिता निखारे, दीपा खरात, अपर्णा कांबळे, रुपाली बरेटो, शिल्पा चौधरी, संगीता कदम, अनिता मागडे, दिशा व्यासपीठाच्या हिरकणी व जयदादा युवा मंचचे सदस्य मयांक सिंग, किशन, मिश्रा, तेजस खाडे, मनमीत सिंग यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा - मीरा भाईंदरमध्ये कोविड रुग्ण दाखवून लुबाडणाऱ्या रुग्णालयावर पालिकेची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.