ETV Bharat / city

डोंबिवली आणि कोपर रेल्वे ठाण्यात प्राणी मित्र संघटनेकडून भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस - रेबीज

सार्वजनिक ठिकणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दरदिवशी अनेक बालक, महिला आणि नागरिक जखमी होत असल्याचे प्रकार घडत आहे.

अॅन्टी रेबीज लसीकरण ठाणे
author img

By

Published : May 12, 2019, 8:25 PM IST

ठाणे - डोंबिवली आणि कोपर रेल्वे ठाण्यात प्राणी मित्र स्वयंसेवकांनी रेबीज प्रतिबंधक लस भटक्या कुत्र्यांना दिली. डोंबिवली आणि कोपर रेल्वे ठाणे, समांतर रोड, २ ब्रिज या परिसरामध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. गेल्या ७ वर्षापासून संस्थेतर्फे उपक्रम राबवण्यात येत आहे.

सार्वजनिक ठिकणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दरदिवशी अनेक बालक, महिला आणि नागरिक जखमी होत असल्याचे प्रकार घडत आहे. यातून नागरिकांना कोणता आजार होवू नये यासाठी मे महिन्यात प्राणी मित्र संघटनेतर्फे ठाणे जिल्ह्यातील सर्व मध्य रेल्वे मार्गावर असलेल्या ठाण्यामधील भटक्या कुत्र्यांना आणि मांजरांना अँटी रेबीजचे लसीकरण केले जाते.

डोंबिवली आणि कोपर स्थानक आणि आजूबाजूचा परिसर हा रेबीज फ्री करण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. आतापर्यंत मे महिन्यात कोपर, ठाकुर्ली, डोंबिवली स्थानकावर लसीकरण करण्यात आले आहे. पुढील शनिवारी विठ्ठलवाडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ स्थानकांवर लसीकरण केले जाईल, असे प्लांट अँड अनिमल्स वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक निलेश भणगे यांनी सांगितले.

डोंबिवली-कोपर  रेल्वे स्थानकातील भटक्या कुत्र्यांचे अँटी-रेबीज लसीकरण

ठाणे :- डोंबिवली आणि कोपर रेल्वे स्थानकावर प्राणी मित्रच्या स्वयंसेवकांनी रेबीज प्रतिबंधक लस भटक्या कुत्र्यांना दिली. डोंबिवली आणि कोपर रेलवे स्थानक, समांतर रोड, 2 ब्रिज या परिसरामध्ये हा उपक्रम राबविला.

सार्वजनिक ठिकणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दरदिवशी अनेक बालक, महिला व नागरिकांवर जखमी होत असल्याचा प्रकार घडतच आहे. त्यातच  गेले 7 वर्षे रात्री हा कार्यक्रम संघटना या संस्थेतर्फे राबवला जात आहे. मे महिन्यात संघटना संस्था ही ठाणे जिल्ह्यातील सर्व मध्य रेल्वे मार्गावर असलेल्या स्थानकांमधील भटक्या कुत्र्यांना व मांजरांना अँटी रेबीजचे लसीकरण करते.  डोंबिवली आणि कोपर स्थानक आणि आजूबाजूचा परिसर हा रेबीज फ्री करण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. ठाणे ते मुंबई ही भारतातील पहिली रेल्वे धावली होती. त्याच स्टेशनवर गेली 7 वर्षे संस्था हा कार्यक्रम राबवत आहे. आतापर्यंत मे महिन्यात कोपर, ठाकुर्ली, डोंबिवली स्थानकावर लसीकरण करण्यात आले आहे. पुढील शनिवारी विठ्ठलवाडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ स्थानकांवर लसीकरण केले जाईल, असे प्लांट अँड अनिमल्स वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक निलेश भणगे यांनी सांगितले.

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.