नवी मुंबई - नवी मुंबई नेरुळ मधील सायलेंट व्हॅली या इमारतीच्या घरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने धाड टाकली. यामध्ये एका घरात बेडखाली ठेवलेल्या गांजा जप्त करण्यात आला, अशी माहिती पोलीस पथकाने दिली आहे.
सायलेंट व्हॅली सोसायटी मधील बिल्डिंग क्रमांक 30 मध्ये 4 क्रमांक रूम मधील बेडखाली मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवला होता. यामध्ये दोन तरुणांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.
200 किलो पेक्षा अधिक गांजा जप्त-
जवळजवळ 200 किलो पेक्षा अधिक गांजा या धाडीत जप्त केला. तरुणाचे आजी आजोबा राहत असलेल्या दुसऱ्या रूमची देखील एनसीबी कडून तपासणी सुरू आहे.
हेही वाचा- गोंडवाना विद्यापीठाने आदिवासी भागातून आत्मनिर्भर भारताची सुरुवात करावी - राज्यपाल