ETV Bharat / city

Kedar Dighe on cm Eknath Shinde : २५ वर्षे गप्प बसून आनंद दिघेंशी खरी प्रतारणा तुम्ही केली, दिघेंच्या पुतण्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

author img

By

Published : Jul 31, 2022, 7:31 AM IST

मी मुलाखत दिली तर देशात भूकंप होईल, अशी गर्जना मालेगावात ( Kedar Dighe on cm Eknath Shinde ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यावर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे ( Eknath shinde over revelation on anand dighe life ) यांनी दिघेंबद्दल काय घडले हे माहित होते तर गप्पा का बसलात? २५ वर्षे गप्प बसून ठाणेकर आणि दिघे साहेबांशी खरी प्रतारणा तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या ( Eknath shinde in Malegaon ) थराला जाणार, असे ट्विट करत त्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे ( Eknath Shinde on Anand Dighe ) यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

Kedar Dighe on cm Eknath Shinde
आनंद दिघे यांच्याशी संबंधित घटना एकनाथ शिंदे

ठाणे - मी मुलाखत दिली तर देशात भूकंप होईल, अशी गर्जना करत मालेगावात ( Kedar Dighe on cm Eknath Shinde ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, शिंदे यांनी जाहीर भाषण करताना ( Eknath shinde over revelation on anand dighe life ) आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या ( Eknath shinde in Malegaon ) घटनांचा मी साक्षिदार आहे. वेळ आली की सांगेन, असा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी दिघेंबद्दल काय घडले हे माहित होते तर गप्पा का बसलात? २५ वर्षे गप्प बसून ठाणेकर आणि दिघे साहेबांशी खरी प्रतारणा तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाणार, असे ट्विट करत त्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे ( Eknath Shinde on Anand Dighe ) यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

हेही वाचा - Thane Shivsena : डोंबिवलीत ठाकरे-शिंदे गटातील वाद; शहरप्रमुखासह दोघांना पोलीस कोठडी

एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचे शिष्य - आनंद दिघे यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे हे मे २०२२ पासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. चित्रपटाच्या रिलीजपासून त्यांच्या मृत्यूविषयी अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. काही जणांच्या म्हणण्यानुसार हा अपघात होता, तर काही जण घातपात असल्याचा दावा करतात. तेव्हाचे पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री आणि आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ठिकठिकाणी जात होते.

दिघे यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला? हा प्रश्न जेव्हा एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात मंत्री शिंदे यांना विचारण्यात आला होता तेव्हा ते म्हणले होते की, आंनद दिघे यांच्या पायाला अपघात झाला होता. पण निदान झाले की हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. दिघेसाहेब गेल्यामुळे आमचे खूप नुकसान झाले. पक्षाचे नुकसान झाले. संघटनेचे नुकसान झाले. दिघेसाहेब एका दिवसात दोन दिवसांचे काम करायचे. असेही शिंदे यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, मुख्यमत्रिपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला केला नव्हता. मात्र शुक्रवारपासून राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या शिंदे यांनी शनिवारी मालेगावात जाहीर सभेत बोलताना ठाकरे याना थेट इशाराच दिला आहे.

25 वर्षे का गप्प बसले, केदार दिघे यांचा सवाल - सामनातील उद्धव ठाकरे यांच्या सुरू असलेल्या मुलाखतींचा दाखला देत सध्या मुलाखती चालू आहेत मात्र मी जर मुलाखत दिली तर देशाच्या राजकारणात भूकंप होईल, असे स्पष्ट करत आनंद दिघे यांच्या बाबत जे घडले त्याचा मी एक साक्षिदार असून, वेळ येईल तेव्हा मला देखील तोंड उघडावे लागेल, असा सूचक इशारा दिला आहे. यावर शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी एक ट्विट करत शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना तुम्हाला जर काही माहित आहे तर २५ वर्षे गप्प बसून ठाणेकर आणि दिघे साहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल? असा सवाल उपस्थित केला असल्याने येत्या काही दिवसांत आनंद दिघे यांच्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

आनंद दिघे यांचा मृत्यू संशयास्पद - आनंद दिघे यांचा मृत्यू होण्यापूर्वी काही तास अनेक नेते आनंद दिघे यांना सिंघानिया रुग्णालयात जाऊन भेटले होते. तेव्हा आनंद दिघे यांनी आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले होते आणि काही वेळातच आनंद दिघे यांचा मृत्यू झाला, म्हणून दिघे यांच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी तोडफोड, जाळपोळ सुरू झाली. संपूर्ण ठाण्यात कर्फ्यू लावण्यात आला होता आणि अशा वेळेस त्यांच्या समर्थकांनी आनंद दिघे यांचे पोस्टमार्टम होऊन दिले नाही आणि म्हणूनच आजतागायत आनंद दिघे यांच्या मृत्यूचे कारण हे समोरच आले नाही. याचाच परिणाम आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

शिंदे गटातील अनेक नेते आनंद दिघे यांचे कार्यकर्ते - आनंद दिघे यांचे काम ठाण्यात अनेक दशक सुरू असताना त्यांनी अनेक मोठे कार्यकर्ते घडवले होते, जे आता शिवसेनेचे नेते म्हणून ओळखले जातात. अनेक नेते आता एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी त्यांच्या गटात आहेत आणि यामुळेच एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात वाद विकोपाला गेलेले आहेत.

नारायण राणे यांनी देखील केली होती टीका - भाजपचे नेते आणि आनंद दिघे यांच्याशी मैत्री असलेले नारायण राणे यांनी महिनाभरापूर्वी आनंदचे जे झाले ते तुमचे देखील झाले असते, असे एकनाथ शिंदे यांना संबोधून सांगितले होते. यासोबत नारायण राणे यांनी आनंद दिघे यांना मातोश्रीवर प्रवेश नव्हता, असा देखील खुलासा केलेला आहे.

हेही वाचा - Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाकडूनही प्रतिज्ञापत्र भरून घेण्यास सुरुवात.. ठाण्यात मोठी गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.